Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: मराठा आंदोलकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा - हिना गावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 16:45 IST

Maratha Reservation भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी मराठा आंदोलकांवर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. आज लोकसभेत गावित यांनी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन दिले.

नवी दिल्ली - भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी मराठा आंदोलकांवर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. आज लोकसभेत गावित यांनी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी माझ्या गाडीवर चढून हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मी आदिवासी खासदा असल्यामुळेच माझ्यावर हा हल्ला करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले. 

मराठा आंदोलकांनी रविवारी खासदार हिना गावित यांच्या गाडीवर चढून थयथयाट केला होता. तसेच गावित यांच्या गाडीची तोडफोडही केली होती. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी खासदार डॉ. हिना गावीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्या होत्या. यावेळी संतप्त आंदोलकांच्या आक्रोशाचा सामना गावित यांना करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. मात्र, आता याप्रकरणी अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी डॉ. हिना गावित यांनी लोकसभेत केली आहे. माझ्या गाडीवर मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी हल्ला केला. यावेळी गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. मी गाडीतून उतरले नसते, तर माझा जीवही गेला असता, असेही गावित यांनी लोकसभेतील निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :मराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चाभाजपाअॅट्रॉसिटी कायदा