मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:13 IST2025-08-30T19:13:05+5:302025-08-30T19:13:32+5:30

कालपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे.

maratha reservation Death of a young man who participated in Manoj Jarange's protest in Mumbai A mountain of grief for the family | मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू

मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे काल शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती. पण आणखी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आली असून आज त्यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली. आंदोलनात सहभागी झालेल्या लातुरातील मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विजय घोगरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद

मृत तरुण हा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील आहे.  या तरुणाला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी मृत घोषित केले. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मराठा मोर्चामुळे मुंबई थांबली असं म्हणणं योग्य नाही- राधाकृष्ण विखे पाटील

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. या आंदोलनामुळे मुंबई थांबली नाही. न्यायाधीश शिंदे समितीचे अध्यक्ष मनोज जरांगेंना भेटण्यासाठी जात आहेत. न्या.शिंदे, विभागीय आयुक्त जरांगेंशी चर्चा करतील. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे ही भूमिका आहे. चर्चेत जे मुद्दे उपस्थित होतील, त्यावर उपसमितीत चर्चा होईल. आंदोलनस्थळी वीज, पाण्याची सोय करण्यात आली आहेत. आंदोलकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. महापालिका आयुक्तही या बैठकीला होते. महायुती म्हणून आम्ही एकत्रित आहोत. या प्रश्नात राजकारण करण्यापेक्षा समस्या कशी सुटेल याकडे पाहिले पाहिजे. मागे काय घडले त्यापेक्षा पुढे काय केले पाहिजे यावर चर्चा झाली पाहिजे. चर्चेतून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. मराठा मोर्चामुळे मुंबई थांबली असं म्हणणं योग्य नाही.  असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. 

Web Title: maratha reservation Death of a young man who participated in Manoj Jarange's protest in Mumbai A mountain of grief for the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.