Join us

मराठा आंदोलनाचं श्रेय एकट्या मुख्यमंत्र्यांच नाही, संसदेत प्रितम मुंडेंचं मराठीत भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 20:52 IST

आरक्षण मिळाल तर कोर्टाची जमेची बाजू आणि आरक्षण मिळाल नाही तर सरकारची जबाबदारी असं नसतं.

मुंबई - मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात रेंगाळलेला होता. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय संवेदनशीलपणे हा प्रश्न हाताळलेला आहे. त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम झालं आहे. पण,  मुख्यमंत्र्यांना एकट्याला मी मराठा आरक्षणाचा श्रेय देत नाही. याच श्रेय संपूर्ण मराठा समाजाला देत आहे. मराठा समाजाने आंदोलने शांतत कशी करावीत, याचा आदर्श जगाला घालून दिला. एक मराठा लाख मराठा हे वाक्य ज्यांनी केवळ म्हटलं नाही, तर जगलं त्या प्रत्येक मराठा माणसाला मी शुभेच्छा देते, असेही प्रितम मुंडेंनी म्हटलंय. 

आरक्षण मिळाल तर कोर्टाची जमेची बाजू आणि आरक्षण मिळाल नाही तर सरकारची जबाबदारी असं नसतं. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यातही भाजपा सरकाराच मोठा वाटा असल्याचे प्रितम मुंडे यांनी म्हटलं. विशेष म्हणजे मराठा आरक्षणसंदर्भात प्रितम मुंडेंनी मराठीत आपलं भाषण केलं. प्रितम मुंडे यांनी लोकसभा सभागृहात विद्यापीठ अनुदान आयोगातील शिक्षक नियुक्त्यासंबंधी सुधारणा विधेयकाचं स्वागत करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरीयाल यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर मराठा आरक्षणावर बोलताना संसदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन केलं. याशिवाय पुन्हा एकदा ओबीसीच्या जनगणनेची मागणी केली. तसेच ओबीसींच्या रिक्त असलेल्या जागा लवकरात लवकर भराव्या, असेही त्यांनी म्हटले. 

 

टॅग्स :प्रीतम मुंडेमुंबईलोकसभामराठा आरक्षण