Maratha Morcha Mumbai video: "मला मारलं, यांच्याकडे हत्यारं"; जखमी असल्याचे नाटक, मराठा आंदोलनात गोंधळ घालणाऱ्याला पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:08 IST2025-08-30T13:03:03+5:302025-08-30T13:08:04+5:30
Maratha Morcha Mumbai News: मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. यावेळी एक व्यक्ती आंदोलकांमध्ये घुसला आणि त्याने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.

Maratha Morcha Mumbai video: "मला मारलं, यांच्याकडे हत्यारं"; जखमी असल्याचे नाटक, मराठा आंदोलनात गोंधळ घालणाऱ्याला पकडले
Maratha Morcha Live Update: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदानात हे आंदोलन सुरू असून, मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देण्यासाठी लोक आले आहेत. आंदोलकांच्या गर्दीत घुसून एका समाजकंटकाने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. पण, काही आंदोलकांमुळे त्यांचे बिंग फुटले. त्याला पोलिसांच्या हवाली केले.
डोक्याला पट्टी आणि जखमी असल्याचे दाखवून एक व्यक्ती मराठा आंदोलकांमध्ये घुसला. त्याने यांनी मला मारलं आहे. यांच्याकडे हत्यारं आहेत, अशी आरडाओरड सुरू केली. त्याला काही आंदोलकांनी पकडले. त्यानंतर त्यांचे जखमी असल्याचे बिंग फुटले.
डोक्याला लाल कलर लावून आला होता समाजकंटक
आंदोलकांनी पकडल्यानंतर त्याचे जखमी असल्याचे नाटक उघडे पडले. डोक्याला पट्टी आणि लाल रंग लावून तो आला होता. 'मला मारलं, यांच्याकडे हत्यारं आहेत', असं म्हणून ओरडू लागला. त्याला आंदोलकांनी पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. याचा व्हिडीओ शेअर करत आंदोलकांनी सावध राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं आहे.
व्हिडीओ शेअर करताना मुंबईतील सकल मराठा समाजाने म्हटलं आहे की, "प्रचंड गर्दी, पाऊस आणि लोकांचे दुर्लक्ष यामुळे एक समाजकंटक आंदोलनात घुसला होता. आरडाओरडा करून स्वतः डोक्याला पट्टी बांधून आणि त्यावर कुंकू, लाल कलर फासून 'मला यांनी मारलं यांच्याकडे हत्यारं आहेत', असं बोलत होता."
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनावेळी एक व्यक्ती आंदोलकांमध्ये घुसला. डोक्याला पट्टी आणि लाल रंग लावून आलेल्या व्यक्ती यांनी 'मला मारलं, यांच्याकडे हत्यारं आहेत', असं म्हणून ओरडू लागला. त्याला आंदोलकांनी पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. याचा व्हिडीओ शेअर करत आंदोलकांनी सावध… pic.twitter.com/YJ0dzkFCJk
— Lokmat (@lokmat) August 30, 2025
"त्याला चोरी करताना पकडून आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलं. अशा लोकांपासून समाजबांधवांनी सावधान रहावे, आजूबाजूला लक्ष ठेवावे. प्रत्येक जण आंदोलनाला आला असेल असं नाही. आपली काळजी आपण घेऊ. काही नतद्रष्ट लोकदेखील असू शकतील. त्यामुळे आपण सावध रहावे हे आवाहन आम्ही करत आहोत", सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.