फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाची चौकशी करणार - नितीन राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 08:01 AM2021-03-20T08:01:05+5:302021-03-20T08:01:47+5:30

ऊर्जा विभागातील कंपन्यांमध्ये मनमानी व नियमबाह्य निर्णय झाल्याचे समोर येत आहे. तज्ज्ञांची समिती नेमून त्याबाबत चौकशी केली जाईल. तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या सल्लागारांचा रोल या बाबींची चौकशी करावी अशा तक्रारी आलेल्या आहेत, असे राऊत म्हणाले.

Many complaints about the management of the energy department during the Fadnavis government we Will investigate says Nitin raut | फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाची चौकशी करणार - नितीन राऊत

फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाची चौकशी करणार - नितीन राऊत

googlenewsNext

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा विभागाच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी असून त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी लवकरच चौकशी समिती नेमण्यात येईल, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. (Many complaints about the management of the energy department during the Fadnavis government we Will investigate says Nitin raut)

ऊर्जा विभागातील कंपन्यांमध्ये मनमानी व नियमबाह्य निर्णय झाल्याचे समोर येत आहे. तज्ज्ञांची समिती नेमून त्याबाबत चौकशी केली जाईल. तत्कालीन ऊर्जा मंत्र्यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या सल्लागारांचा रोल या बाबींची चौकशी करावी अशा तक्रारी आलेल्या आहेत, असे राऊत म्हणाले. १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी केली जात नाही याकडे लक्ष वेधले असता राऊत म्हणाले की, वीज कंपन्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे मी म्हटले होते. आज ती परिस्थिती नाही. लॉकडाऊन काळातील चार महिन्यांची बिले कमी करण्यासंदर्भात सात प्रस्ताव ऊर्जा विभागाने सरकारकडे दिले आहेत. आता निर्णय सरकारने घ्यायचा आहे.

 

Web Title: Many complaints about the management of the energy department during the Fadnavis government we Will investigate says Nitin raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.