यंत्रणांच्या चौकशीमुळे मनसुख हिरेन कुटुंबीय हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:40 AM2021-03-13T02:40:50+5:302021-03-13T02:41:26+5:30

अंबानी यांच्या घराजवळ  सापडलेल्या मनसुख यांच्या कारबाबत  विक्रोळी पोलीस, मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग आणि एटीएस यांच्याकडून मनसुख यांची वेगवेगळ्या दिवशी चौकशी केली

Mansukh Hiren family harassment due to systemic investigation | यंत्रणांच्या चौकशीमुळे मनसुख हिरेन कुटुंबीय हैराण

यंत्रणांच्या चौकशीमुळे मनसुख हिरेन कुटुंबीय हैराण

googlenewsNext
ठळक मुद्देअंबानी यांच्या घराजवळ  सापडलेल्या मनसुख यांच्या कारबाबत  विक्रोळी पोलीस, मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग आणि एटीएस यांच्याकडून मनसुख यांची वेगवेगळ्या दिवशी चौकशी केली

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘ॲन्टिलिया’ निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी निगडित महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकासह (एटीएस) रोज वेगवेगळ्या यंत्रणांकडून, च्च पातळीवर तपास करत आहे. त्याच अनुषंगाने हिरेन यांच्या कुटुंबीयांना रोज वेगवेगळ्या चौकशींना सामोरे जावे लागत असल्यामुळे हे कुटुंब हैराण झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

अंबानी यांच्या घराजवळ  सापडलेल्या मनसुख यांच्या कारबाबत  विक्रोळी पोलीस, मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग आणि एटीएस यांच्याकडून मनसुख यांची वेगवेगळ्या दिवशी चौकशी केली. त्यातच कांदिवलीच्या कथित तावडे साहेबांचा फोन आल्याने ते ४ मार्च रोजी सायंकाळी दुकानातून बाहेर पडले. घरी रात्री ८.१८ वा. गेले. लगेच १० मिनिटांमध्ये तिथून ते ठाण्यातील घोडबंदर रोडला तावडे साहेबांकडे जाऊन येतो, असे सांगून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी थेट त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळले. या घटनेने त्यांचे कुटुंबीय पुरते हादरले. त्यांची पत्नी विमला या तर या घटनेनंतर अनेकवेळा बेशुद्ध पडल्या. तरीही स्वत:ला सावरून त्यांनी चांगले स्विमर असलेले आपले पती आत्महत्या करू शकत नसल्याचे सांगून त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.
मनसुख बेपत्ता झाल्यानंतर सुरुवातीला ठाण्याचे नौपाडा पोलीस, त्यापाठोपाठ त्यांचा मृतदेह आढळला. ते मुंब्रा पोलीस आणि त्यापाठोपाठ ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. हे प्रकरण एटीएसकडे सोपविल्यामुळे ६ मार्चपासून एटीएसकडून तपास सुरू आहे. एटीएसने सलग तीन दिवस या कुटुंबाची चौकशी केली. त्यापाठोपाठ एनआयएकडून गुरुवारी तीन तास चौकशी झाली. तरी कोणतीही ठोस माहिती एकाही यंत्रणेकडे आली नाही. 
केवळ नौपाड्यात दाखल झालेला मनसुख हिरेन यांचा मानव मिसिंग या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याने ही फाईल आता बंद झाली. पण, मुंब्रा पोलीस ठाण्यात ५ मार्च रोजी त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर दाखल झालेला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा एटीएसकडे वर्ग झाला. यात कुटुंबाच्या आरोपानंतर तसेच परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हत्या, पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला. पुढे मात्र या हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात एटीएसला यश आलेले नाही. एकीकडे आपला माणूसही गेला, दुसरीकडे चौकशीचा ससेमिराही सुरू असल्यामुळे हिरेन कुटुंब आणखीनच अस्वस्थ असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Web Title: Mansukh Hiren family harassment due to systemic investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.