Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मानखुर्द शिवाजी नगर हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नवाब मलिक, समाजवादी पक्षाचे अबू असीम आझमी आणि शिवसेनेचे सुरेश (बुलेट) पाटील हे रिंगणात आहेत. मानखुर्द शिवाजी नगरमध्येनवाब मलिक यांना मोठ धक्का बसला आहे. सुरुवातीच्या निकालानुसार नवाब मलिक हे थेट चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तर अबू असीम आझमी यांनी मोठ आघाडी मिळवली आहे.
राष्ट्रवादीचे अणुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक यानी यंदा मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली. नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी महायुतीमधील घटक पक्षांची मागणी होती. तरीही अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली. मात्र भाजपने मलिक यांच्या प्रचार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून बुलेट पाटील यांना मानखुर्दमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. त्यामुळे महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण लढत झाली. मात्र आता निकालानंतर नवाब मलिक यांना मोठा फटका बसल्याचे समोर आलं असून सध्या ते पराभवाच्या छायेत आहेत.
Maharashtra Assembly Election Results
सातव्या फेरीअखेर नवाब मलिक हे चौथ्या स्थानावर असून त्यांना केवळ ३२९२ मते मिळाली आहेत. तर समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे पहिल्या स्थानावर असून त्यांना २४२७२ मते मिळाली आहेत. तर शिंदे गटाचे बुलेट पाटील हे तिसऱ्या स्थानावर असून त्यांना ५३२५ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात अबू आझमी आणि नवाब मलिक यांच्यात मुख्य लढत होईल असं मानलं जात होतं. मात्र आता दुसऱ्या स्थानी असलेल्या एआयएमआयएमचे अतिक अहमद खान यांना २२१८३ मते मिळाली आहेत.
त्यामुळे नवाब मलिक हे मोठ्या पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहेत. नवाब मलिक हे तब्बल २०९८० हजार मतांनी मागे आहेत.