मंगेश नारायणराव काळे, शफाअत खान, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह ३४ जणांना उत्कृष्ट वाङ्मयासाठी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 05:48 PM2021-01-28T17:48:43+5:302021-01-28T17:49:40+5:30

Maharashtra News : स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2019 जाहीर झाले आहेत. यामध्ये मंगेश नारायणराव काळे, शफाअत खान, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह एकूण ३४ जणांना वाङ्मयासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Mangesh Narayanrao Kale, Shafaat Khan, Dr. Award for Outstanding Literature to 34 persons including Shripal Sabnis | मंगेश नारायणराव काळे, शफाअत खान, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह ३४ जणांना उत्कृष्ट वाङ्मयासाठी पुरस्कार

मंगेश नारायणराव काळे, शफाअत खान, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह ३४ जणांना उत्कृष्ट वाङ्मयासाठी पुरस्कार

googlenewsNext

मुंबई - मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप समारोप झाला असून, आज स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-2019 जाहीर झाले आहेत. यामध्ये मंगेश नारायणराव काळे, शफाअत खान, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह एकूण ३४ जणांना वाङ्मयासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. या सर्व पुरस्कार विजेत्यांचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या साहित्यिकांनी मराठी भाषा संवर्धन व वृद्धी यासाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या 34 पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली. यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे, कला शिक्षक गोपाल वाकोडे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजीत डिसले उपस्थित होते.

सन 2019 या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक / साहित्यिकांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

१) प्रौढ वाङ्मय - काव्य कवी केशवसूत पुरस्कार 1,00,000/- मंगेश नारायणराव काळे, मायावी ये तहरीर (पोएट्रीवाला पेपरवॉल मीडिया ॲण्ड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई)
२) प्रथम प्रकाशन - काव्य बहिणाबाई चौधरी पुरस्कार 50,000/- संदीप शिवाजीराव जगदाळे, असो आता चाड (लोकवाङ्मय गृह, मुंबई)
३) प्रौढ वाङ्मय - नाटक/एकांकिका राम गणेश गडकरी पुरस्कार 1,00,000/- शफाअत खान, गांधी आडवा येतो (पॉप्युलर प्रकाशन, मुंबई)
४) प्रथम प्रकाशन - नाटक/एकांकिका विजय तेंडुलकर पुरस्कार 50,000/- अनुप जत्राटकर, निष्पर्ण पिंपळाच्या छायेत (तेजस पब्लिकेशन, कोल्हापूर)
५) प्रौढ वाङ्मय - कादंबरी हरी नारायण आपटे पुरस्कार 1,00,000/ -
मनोज बोरगावकर, नदीष्ट (ग्रंथाली, मुंबई)
६) प्रथम प्रकाशन - कादंबरी श्री.ना.पेंडसे पुरस्कार 50,000/- ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर, यसन (स्वयंदीप प्रकाशन, पुणे)
७) प्रौढ वाङ्मय - लघुकथा दिवाकर कृष्ण पुरस्कार 1,00,000/- धर्मराज निमसरकर, हुंदक्यांची काहिली (दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे)
८) प्रथम प्रकाशन - लघुकथा ग.ल.ठोकळ पुरस्कार 50,000/- डॉ. विजय जाधव, अस्वस्थ तांडा (ग्रंथाली, मुंबई)
९) प्रौढ वाङ्मय झ्र ललितगद्य (ललित विज्ञानासह) अनंत काणेकर पुरस्कार 1,00,000/- नयना सहस्त्रबुद्धे, स्त्रीभान (अमेय प्रकाशन, पुणे)
१०) प्रथम प्रकाशन - ललितगद्य ताराबाई शिंदे पुरस्कार 50,000/- डॉ. ऐश्वर्या रेवडकर, बिजापूर डायरी (साधना प्रकाशन, पुणे)
११) प्रौढ वाङ्मय - विनोद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 1,00,000/- प्रा.अनिल सोनार, गझल मिस्किली (रजत प्रकाशन, औरंगाबाद)
१२) प्रौढ वाङ्मय - चरित्र न. चिं. केळकर पुरस्कार 1,00,000/- अनिता पाटील, सूर्यकोटि समप्रभ द्रष्टा अणुयात्रिक डॉ. अनिल काकोडकर (मनोविकास प्रकाशन,पुणे)
१३) प्रौढ वाङ्मय - आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार 1,00,000/-
अशोक राणे, सिनेमा पाहणारा माणूस (संधिकाल प्रकाशन, भाईंदर)
१४) प्रौढ वाङ्मय - समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन श्री. के. क्षीरसागर पुरस्कार 1,00,000/- नीलिमा गुंडी गतकाळाची गाज मौज प्रकाशन गृह, मुंबई

१५) प्रथम प्रकाशन - समीक्षा सौंदर्यशास्त्र, रा.भा.पाटणकर पुरस्कार 50,000/- शिफारस नाही
१६) प्रौढ वाङ्मय- राज्यशास्त्र/समाजशास्त्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 1,00,000/- डॉ. हमीद दाभोलकर, विवेकाच्या वाटेवर (राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे)
१७) प्रौढ वाङ्मय - इतिहास शाहू महाराज पुरस्कार 1,00,000/- गोपाळ चिप्पलकट्टी, प्राचीन भारतीय संस्कृती: मूलाधारांच्या शोधात (सदामंगल पब्लिकेशन, मुंबई)
१८) प्रौढ वाङ्मय - भाषाशास्त्र/व्याकरण, नरहर कुरूंदकर पुरस्कार 1,00,000/- खंडेराव कुलकर्णी, मराठी व्याकरण : स्वरूप व चिकित्सा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे)
१९) प्रौढ वाङ्मय - विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार 1,00,000/- डॉ.व्ही.एन.शिंदे, आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया (अक्षर दालन, कोल्हापूर)
२०) प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह वसंतराव नाईक पुरस्कार 1,00,000/- रमेश जाधव, पोशिंद्याचे आख्यान एक प्रश्नोपनिषद (साधना प्रकाशन, पुणे)
२१) प्रौढ वाङ्मय - उपेक्षितांचे साहित्य (वंचित, शोषित, पिडीत, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 1,00,000/- डॉ. श्रीपाल सबनीस, आदिवासी प्रतिभावंतांचे मराठी साहित्य (दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे)
२२) प्रौढ वाङ्मय - अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन सी.डी. देशमुख पुरस्कार 1,00,000/- डॉ. गुरूदास नूलकर, अनर्थशास्त्र अर्थशास्त्र पर्यावरण आणि विषमता, (मनोविकास प्रकाशन,पुणे)
२३) प्रौढ वाङ्मय - तत्त्वज्ञान व मानसशास्त्र ना.गो. नांदापूरकर पुरस्कार 1,00,000/- मनीषा बाठे, रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट एक तौलनिक मागोवा (समर्थ मिडिया सेंटर, पुणे)
२४) प्रौढ वाङ्मय - शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 1,00,000/- परेश जयश्री मनोहर व संतोष शेंडकर, शिक्षणकोंडी (रोहन प्रकाशन, पुणे)
२५) प्रौढ वाङ्मय - पर्यावरण डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार 1,00,000/- अच्युत गोडबोले, अनर्थ विकासनीती : सर्वनाशाच्या उंबरठयावर ? (मनोविकास प्रकाशन, पुणे)
२६) प्रौढ वाङ्मय - संपादित/ आधारित रा.ना.चव्हाण पुरस्कार 1,00,000/- संपादक श्याम माधव धोंड, कवी अनिल यांची संपूर्ण कविता (विजय प्रकाशन, नागपूर)
२७) प्रौढ वाङ्मय - अनुवादित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार 1,00,000/- अनुवादक माधव वझे, प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक (राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे)
२८) प्रौढ वाङ्मय - संकीर्ण (क्रीडासह) भाई माधवराव बागल पुरस्कार 1,00,000/- डॉ. सुरेश हावरे, शिदोरी (राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे)
२९) बालवाङ्मय - कविता बालकवी पुरस्कार 50,000/- विलास कांतीलाल मोरे शाळेला सुट्टी लागली रे २२, (दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे)
३०) बालवाङ्मय - नाटक व एकांकिका भा.रा. भागवत पुरस्कार 50,000/- सुनंदा गोरे, नवी प्रतिज्ञा (गोदा प्रकाशन, औरंगाबाद)
३१) बालवाङ्मय - कादंबरी साने गुरुजी पुरस्कार 50,000/- बबन मिंडे, दौलतबंकी आणि त्याचा खजिना (राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे)
३२) बालवाङ्मय - कथा ( छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह) राजा मंगळवेढेकर पुरस्कार 50,000/- स्वाती राजे, शोध (रोहन प्रकाशन, पुणे)
३३) बालवाङ्मय - सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे) यदुनाथ थत्ते पुरस्कार 50,000/- विजय तांबे, बबडू बँकेत (रोहन प्रकाशन, पुणे)
३४) बालवाङ्मय - संकीर्ण ना.धो. ताम्हणकर पुरस्कार 50,000/- आशा बोकील, अनंत तिची ध्येयासक्ती : बचेंद्रीपाल, आशा बोकील, पुणे
३५) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार 1,00,000/- अदिती बर्वे, सौदीतले दिवस (पद्मगंधा प्रकाशन, पुणे)

Web Title: Mangesh Narayanrao Kale, Shafaat Khan, Dr. Award for Outstanding Literature to 34 persons including Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.