Join us

मंधानाच्या शानदार खेळाने सिडनी थंडरचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 06:11 IST

भारताची सलामीवीर मंधाना हिला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. मात्र, तिने ३९ चेंडूंत सहा षटकार लगावले. तिने कोरिन्ने हॉल (१९) सोबतच तिसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी करीत संघाला लक्ष्याजवळ पोहोचविले. 

मॅकॉय, ऑस्ट्रेलिया : टी २० प्रकारांत भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाच्या ४५ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर विद्यमान चॅम्पियन सिडनी थंडरने महिला बिग बॅश लीग (डब्लूबीबीएल)मध्ये रविवारी येथे सिडनी सिक्सर्सविरोधात सहा गड्यांनी विजय मिळवून दिला.  

भारताची सलामीवीर मंधाना हिला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. मात्र, तिने ३९ चेंडूंत सहा षटकार लगावले. तिने कोरिन्ने हॉल (१९) सोबतच तिसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी करीत संघाला लक्ष्याजवळ पोहोचविले. भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने चौकार लगावत २८ चेंडू शिल्लक असतानाच संघाला विजय मिळवून दिला. सिडनी सिक्सर्सने २० षटकांत ९४ धावा केल्या, तर थंडर्सने १५.२ षटकांतच ९५ धावा करीत विजय मिळविला.

टॅग्स :स्मृती मानधनाआॅस्ट्रेलिया