Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:15 IST2025-09-23T15:12:09+5:302025-09-23T15:15:20+5:30

Mumbai Local Train News: दिवा स्थानकाजवळ एसी लोकल ट्रेनच्या छतावर चढलेला तरूण ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आला. 

Man Climbs Atop Local Train in Mumbai, Suffers Severe Electric Shock | Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!

Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!

आज सकाळी दिवा स्थानकाजवळ एसी लोकल ट्रेनच्या छतावर चढलेला तरूण ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यानंतर गंभीर जखमी झाला. तरुणाला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून कळवा येथील शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची सध्याची प्रकृती चिंताजनक आहे.

ही घटना एसी लोकल ट्रेन क्रमांक K/25 मध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही लोकल सकाळी १० वाजताच्या सुमारास दिवा स्थानकावर येत असताना संबंधित तरूण कोच क्रमांक १९८७१६ सीआरच्या छतावर बसलेला दिसला. लोकल दिवा स्थानकात येताच त्या तरुणाने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो हाय व्हॉल्टेज ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आला. त्यामुळे त्याला वीजेचा धक्का बसला आणि गंभीररित्या भाजला.

या घटनेबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलीस जे.के. वर्मा (उपनिरीक्षक), शिवकुमार मीना (सहाय्यक उपनिरीक्षक) आणि स्टेशन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी तरुणाला छतावरून खाली उतरण्यात आले. जखमी तरुणाला तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून कळवा येथील शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची सध्याची प्रकृती चिंताजनक आहे.

रेल्वे वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली, २६ मिनिटांच्या विलंबानंतर सकाळी १०:३८ वाजता लोकल पुन्हा सुरू झाली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अशा धोकादायक आणि बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. ट्रेनच्या छतावर प्रवास करणे हा केवळ धोकादायक नाही, तर रेल्वे कायद्यानुसार तो एक गंभीर गुन्हा आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Man Climbs Atop Local Train in Mumbai, Suffers Severe Electric Shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.