Join us

'मला एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवा', लालबागच्या राजाला नवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 16:39 IST

एक दिवसाच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अनिल कपूरच्या नायक चित्रपटात आपण पाहिला होता.

मुंबई: एक दिवसाच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अनिल कपूरच्या नायक चित्रपटात आपण पाहिला होता. त्यामध्ये अन्याय आणि भ्रष्टाचार होत असल्याने अनिल कपूर फक्त एक दिवस मुख्यमंत्री पद सांभाळत अनेक भ्रष्टाचारविरुद्ध कारवाई करताना या चित्रपटात दाखविले आहे. मात्र खऱ्या आयुष्यात देखील बीड मधील एका तरुणाला एक दिवसाचा मुख्यमंत्री बनायचे आहे. बीड जिल्ह्यातील एका तरुणाने महाराष्ट्राचे राज्यपालांना पत्र लिहून एक दिवसांचा मुख्यमंत्री करण्याची विनंती केली आहे. तसेच एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्यासाठी त्याने चक्क लालबागच्या राजाकडे नवस देखील केल्याचे समोर आले आहे. 

बीडमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय श्रीकांत विष्णू गदळे यांना राज्यातील अनेक समस्या सोडविण्याचा विश्वास असल्याने त्याने एक दिवसाचा मुख्यमंत्री बनवा अशी विनंती केली आहे. तसेच त्याची ही विनंती राज्यपालांनी मान्य केल्यास शेतकरी, बेरोजगार तसेच व्यापारी संबंधातील प्रश्नांवर तात्काळ चांगले निर्णय घेऊन समस्यांना न्याय देऊ शकतो असे त्याने सांगितले आहे.

त्याचप्रमाणे श्रीकांतने तीन वर्षाआधी एक दिवसाचा मुख्यमंत्री बनन्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी मुंबईतील प्रसिद्घ गणपती असलेल्या लालबागच्या राजाकडे देखील नवस केला होता. तसेच नवस करताना नारळ उभा फुटल्याने श्रीकांतला लालबागच्या राजाच्या आर्शिवादाने त्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास आहे. त्यामुळे त्याने चक्क बीड पासून चालत येत लालबागच्या राजापर्यत पोहचला आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रलालबागचा राजामुख्यमंत्री