Join us
Daily Top 2Weekly Top 5

'महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध करून देऊ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 12:25 IST

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन संचलन समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाशी संवाद साधला. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यावेळी उपस्थित होते. त्यावेळी बोलताना, महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध करून देऊ, अशा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. 

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुल आणि सर्व सुविधायुक्त 448 सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात तळमजल्यासह सात मजल्यांच्या 16 इमारतींचा समावेश असणार आहे. 

पोलीस नेहमीच तणावात असतात, त्यामुळे नववर्षात त्यांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी पोलिसांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, पोलिसांचे संचलन आणि मानवंदना यांचा सन्मान स्वीकारण्याची संधी मिळाली हा आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. पोलिसांचे प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा यासाठी जगातील सर्वोत्तम गोष्टी महाराष्ट्र पोलिसांना उपलब्ध करून देण्याची ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.

टॅग्स :उद्धव ठाकरेपोलिसमुंबईआदित्य ठाकरे