माहीम परिसरात मोठी आग लागली. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले. मात्र स्फोटामुळे दोघांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या होत्या. यामुळे या दोघांचा जागेवर मृत्यू झाला.
अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे कर्मचारी आणि माहीम पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत आगीत अडकलेल्या इतर लोकांना सुरक्षित बाहेर काढले. याप्रकरणी माहीम पोलीस आणि अग्निशमन दल अधिकचा तपास करत आहेत.