Join us  

ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 6:06 PM

Power Of State : वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी.

मुंबई : राज्यभरात शाळा, महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. आयटी व इतर क्षेत्रात वर्क फ्रॉम होम सुरु आहे. या कारणात्सव वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी. अत्यावश्यक कामे असल्याखेरीज वीज यंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये, असे निर्देश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी दिले.

३१ ऑक्टोबरपर्यंत शैक्षणिक वर्ग बंद राहणार आहेत. शालेय वर्ग, परीक्षा इतर महत्वाच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरु आहेत. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी. तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात यावा. आवश्यक काम असल्याशिवाय वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये. दुरूस्तीचे काम आवश्यक असल्यास ऑनलाईन शैक्षणिक वर्ग व परीक्षांचा कालावधी टाळून कामे करण्यात यावे. तत्पुर्वी शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधावा. आणि दुरुस्तीचे नियोजन करावे. याची माहिती एसएमएसद्वारे वीजग्राहकांना देण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, कोरोना काळात आलेल्या वीज बिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले. भरमसाठ आलेल्या वीज बिलांमुळे ग्राहक मेटाकुटीला आला. वीज कंपन्यांना ग्राहकांनी भांडावून सोडले. मात्र वीज बिलाचा प्रश्न काही अजून सूटला नाही. यावर महावितरणचे अधिकारी, मोठ-मोठया सोसायटीमध्ये वीज ग्राहकांसाठी मदत कक्ष स्थापन करून तेथील ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीज बिलाबाबत माहिती देत आहेत. व्हाट्स अप ग्रुप बनवून ग्राहक प्रतिनिधींशी संवाद साधत मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा वीज बिलाबाबत माहिती देण्यात येत आहे. 

टॅग्स :शिक्षणऑनलाइनमुंबईमहावितरणमहाराष्ट्र