मुंबई - कांदिवलीतील आरएनए रॉयल येथे राहणाऱ्या जयेश शाह (वय - ४६) यांना त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या मोलकरणीने ७ लाखांचा चुना लावला आहे. याबाबत शाह यांनी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार महिला आरोपी हि गेल्या अनेक महिन्यांपासून शाह यांच्याकडे मोलकरीण म्हणून काम करत होती. मात्र, साफसफाईचा बहाण्याने खोलीत जाऊन कपाटातील ७ लाख रुपये मोलकरणीने लंपास केले आणि पळ काढला. त्यानंतर ती घरकाम करण्यासाठी आली नाही. नंतर शाह यांना ७ लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी चारकोप पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फरार महिला आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
मोलकरणीने मालकाला लावला ७ लाखांचा चुना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 22:02 IST