Join us  

Mahavikas Aghadi Ministry Expansion : सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री, अजित पवारांचा होणार शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 9:34 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार हेच

मुंबई - राज्यात महाविकासआघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि शपथविधी लवकरच आज दुपारी 1 वाजताच्या मुहुर्तावर होत आहे. त्यामध्ये काँग्रेसचे 10 आणि शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागली आहे. अजित पवार समर्थक आमदारांनी अजित पवार यांच्यासाठी लॉबिंग केले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असल्याचे मत व्यक्त केले होते. अण्णा बनसोडे यांना तुम्हाला मंत्रिपद मिळेल का या प्रश्नावर माझे जाऊ द्या, अजित पवार हेच आमचे मुख्यमंत्री आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीची अंतिम यादी तयार झाली असून अजित पवारांचे नाव उपमुख्यमंत्रीपदी असल्याचे समजते. त्यामुळे, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. गेल्याच महिन्यात भाजपासोबत सरकार स्थापन करत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, बहुमत सिद्ध करणे शक्य नसल्याचे ओळखत त्यांनी आपला राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनीही आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला. त्यामुळे अजित पवार हे सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीही अजित पवारांनी उपमुख्यमंत्री व्हावे, ही राज्यभरातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मला तर वाटते, अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे. मात्र, मला वाटून काय होणार. पक्षाचे सर्व निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतात. त्यांचा निर्णय माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांना मान्य असणार असल्याचे स्पष्ट केले होते.

टॅग्स :अजित पवारउद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईमंत्री