VIDEO : माहीमच्या बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत मनसेचा राडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 22:10 IST2018-06-18T22:05:02+5:302018-06-18T22:10:41+5:30

दारुच्या नशेत हॉकी स्टिकने केली मारहाण, शाखाध्यक्ष अटकेत

Mahasam Bar in drowsy condition of MNS's Rada ... | VIDEO : माहीमच्या बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत मनसेचा राडा...

VIDEO : माहीमच्या बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत मनसेचा राडा...

मुंबई : माहिमच्या रॉयल बार अ‍ॅण्ड रेस्टारंटमध्ये रविवारी मनसेच्या पदाधिका-यांनी दारुच्या नशेत अन्य ग्राहकांसोबत हुज्जत घातली. त्यांना हटकल्याच्या रागात त्यांनी तेथील वेटरलाच हॉकी स्टिकने मारहाण केली. तसेच बारबाहेरही बार मालकाच्या भावावर पोलिसांसमोरच हल्ला चढविला. याप्रकरणी दादरमधील मनसे शाखाध्यक्ष अभिषेक गुप्तासह दोघांना अटक केली आहे. यामध्ये वेटर आकाश कुमार गुप्ता हा जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन, रविवारी रात्री १० च्या सुमारास नेहमीप्रमाणे अभिषेक गुप्ता, सुनील परदेशी, रवी आणि आणखी एक जण नेहमीप्रमाणे नशेसाठी आले. रात्री १ च्या सुमारास दारुच्या नशेत त्यांनी अन्य ग्राहकांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. आकाशने भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी घेतली. तर त्यांनी आकाशलाच मारहाण सुरु केली.

काही जण थेट हॉकी स्टिक घेऊन आले. आणि हॉकी स्टिकने त्यांनी मारहाण सुरु केली. पुढे व्यवस्थापक मुकुंद आचार्य यांना देखील जीवे ठार मारण्याची धमकी देत ते बाहेर पडले. घटनेची वर्दी लागताच माहीम पोलीस तेथे दाखल झाले. तेव्हा दोघांनी पळ काढला. स्थानिकांनाही त्यांनी दमदाटीचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी अभिषेक गुप्ता आणि आणखीन एकाला बेड्या ठोकल्या. मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुसुम वाघमारे यांनी दिली.

Web Title: Mahasam Bar in drowsy condition of MNS's Rada ...

टॅग्स :MNSमनसे