Join us

Maharashtra Vidhimandal Adhiveshan Live: उद्धव ठाकरे यांनी प्रवण मुखर्जी यांना वाहिली श्रद्धांजली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 12:46 IST

कोरोनामुळे या अधिवेशनात केवळ दोनच दिवस कामकाज होणार आहे. आधी अधिवेशन लांबणीवर टाकले होते. मात्र, आता दोन दिवसांचे अधिवेशन नियोजित करण्यात आले आहे.

मुंबई  -  : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे या अधिवेशनात केवळ दोनच दिवस कामकाज होणार आहे. आधी अधिवेशन लांबणीवर टाकले होते. मात्र, आता दोन दिवसांचे अधिवेशन नियोजित करण्यात आले आहे. दरम्यान, त्यासाठी अधिवेशनाच्या कामकाजात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.  प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात नसेल. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांना विधानसभेत वाहिली श्रद्धांजली 

प्रणव मुखर्जींचे कुणाशी वैर नव्हते. त्यांनी भाषणबाजीपेक्षा काम जास्त केले. प्रणव मुखर्जी यांनी त्याकाळी अनेकदा सरकारला वाचवलं, पक्षाला वाचवलं. जेव्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणव मुखर्जींना उघड पाठिंबा दिला  त्यानंतर एकदा ते मुंबईत आले  होतेतेव्हा त्यांच्याकडून बोलावणे आले. भेटल्यावर त्यांनी महापालिका निवडणुकीतील विजयासाठी माझे अभिनंदन केले. तेव्हा ते म्हणाले मला वाटलं नव्हतं मी राष्ट्रपती होईन, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मी राष्ट्रपती झालोहे ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुला भेटत आहे असं त्यांनी सांगितलं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण रात गयी बात गयीखुर्ची मिळाली की विचार करत नाहीत. मी त्यांना सभागृहाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानभवनात प्रवेश करण्यासाठी गोंधळ

 कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाठी अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणात खबदरादी घेतली जात. आहे. कोरोना अहवाल असल्याशिवाय सभागृहात प्रवेश मिळत नाही आहे.  काल विधानभवनात चाचणी केलेल्या अनेक आमदार आणि कर्मचार्‍यांचे कोरोना अहवाल प्रलंबित आहे.  त्यामुळे त्यांना विधानभवनात प्रवेश मिळणे कठी झाले होते. अखेरीस  आमदारांनी आपली अडचण अजित पवार यांना सांगितली. त्यानंतर  अजित पवारांनी हस्तक्षेप करून आमदारांना विधानभवनात प्रवेश मिळवून दिला.

ग्रामपंचायत‌ सुधारणा विधेयकाला फडणवीस यांचा आक्षेप विधेयक मांडण्यास उपाध्यक्षांनी अनुमती दिल्याने विरोधकांनी केला सभात्याग

-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अधिवेशनासाठी आगमन 

 

- विधानभवनात प्रवेश करण्यासाठी गोंधळ

- उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्या मांडल्या

- एका आसनावर दोन ऐवजी एकाच सदस्याची बसण्याची व्यवस्था

- अध्यक्ष नाना पटोले कोरोनाबाधित असल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुरू केले कामकाज 

- कोरोनाच्या सावटाखाली विधिमंडळाचे अधिवेशन सुरू

टॅग्स :विधान भवनमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र