Vidhan Sabha 2019: विधानसभेसाठी ७५ खर्च निरीक्षक नियुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 04:59 IST2019-09-20T04:58:55+5:302019-09-20T04:59:21+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने प्राप्तिकर विभागातील ११० वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘खर्च निरीक्षक’ म्हणून नेमणूक केली आहे.

Vidhan Sabha 2019: विधानसभेसाठी ७५ खर्च निरीक्षक नियुक्त
मुंबई : महाराष्ट्र व हरियाणात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने प्राप्तिकर विभागातील ११० वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘खर्च निरीक्षक’ म्हणून नेमणूक केली आहे. यापैकी ७५ निरीक्षक महाराष्ट्रासाठी असतील.
आयोगाच्या सूत्रांनी सांगितलेकी, निवडणुकीत काळ््या पैशाचा वापर व मतदारांना विविध मार्गांनी प्रलोभने दाखविण्याचे प्रकार यावर हे निरीक्षक बारकीईने लक्ष ठेवतील. नव्या कामाची माहिती देण्यासाठी आयोगाने या निरीक्षकांची पहिली बैठक २३ सप्टेंबर रोजी बोलाविली आहे. निवडणुकीसाठी होणारी पैशाची वाहतूक वेळीच पकडण्यासाठी प्राप्तिकर विभागाने निवडणूक होत असलेल्या व त्याच्या शेजारी राज्यांमध्ये आपल्या गुप्तवार्ता शाखा सक्रिय कराव्यात तसेच विमानतळांवरील प्रवाशांकडे विशेष लक्ष केंद्रीय करावे, असेही निर्देश आयोगाने दिले आहेत.