ST च्या प्रलंबित मुद्द्यांसंदर्भात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:51 PM2021-09-24T12:51:39+5:302021-09-24T12:53:14+5:30

राज्यसरकाने आमचे पालकत्व स्विकारून एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्यशासनात करावे, अशी आग्रही मागणी केली आहे

maharashtra union office bearers met Sharad Pawar regarding pending issues of ST | ST च्या प्रलंबित मुद्द्यांसंदर्भात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

ST च्या प्रलंबित मुद्द्यांसंदर्भात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट

Next

मुंबई: सध्या आर्थिक संकटामुळे एसटी कर्मचारी अतिशय विपरीत मनस्थितीमध्ये असून आत्महत्येसारखे दुर्दैवी व टोकाचे पाऊल उचलत आहेत. तेव्हा एसटी ची व कर्मचा-याची परिस्थिती बदलायची असेल तर राज्यसरकाने आमचे पालकत्व स्विकारून एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्यशासनात करावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

आज दि २४ सप्टेंबर २०२१ रोजी सिल्व्हर ओक येथे जनरल सेक्रेटरी श्री हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी शरद पवार साहेब यांची भेट घेऊन एस टी कामगारांच्या अनेक प्रलंबित मुद्यावर सविस्तर चर्चा केली. २ व ३ टक्के महागाई भत्याचा फरक ५ टक्के महागाई भत्ता फरकासह लागू करणे. केंद्राला आता २८ टक्के म.भत्ता लागू झालेला आहे. घरभाडे भत्ता ८/१६/२४ टक्के करणे वेतनवाढीचा दर ३ टक्के करणे, एकतर्फी वेतनवाढ ४८४९ कोटी रूमधील उर्वरीत रक्कम ग्रेड पे च्या स्वरूपात देणे या आर्थिक मुद्यावर चर्चा करत असताना दि १५ जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे आपण व परिवहन मंत्री महोदय यांच्या समवेत बैठक झाली व या बैठकीत एस टी कामगारांची आर्थिक देणी देण्याचे परिवहन मंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे. व या संदर्भात संघटनेची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्र्यांसमवेत बैठक आपल्यासमवेत लावण्याची विनंती केली व ही बैठक लावण्याचे खासदार शरद पवार यांनी मान्य केले आहे.
 

Web Title: maharashtra union office bearers met Sharad Pawar regarding pending issues of ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app