CoronaVirus News: गेल्या २४ तासांत राज्यात ९२५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९२९ जणांनी कोरोनावर केली मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 23:36 IST2021-12-15T23:29:57+5:302021-12-15T23:36:47+5:30
राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 467 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

CoronaVirus News: गेल्या २४ तासांत राज्यात ९२५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९२९ जणांनी कोरोनावर केली मात
मुंबई: राज्यभरात गेल्या 24 तासांत राज्यात आज 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 929 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 94 हजार 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.
राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 467 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 868 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 864 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 71 , 82, 510 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
COVID19 | Maharashtra reports 925 new cases & 10 deaths today; Active caseload at 6,467
— ANI (@ANI) December 15, 2021
4 more patients have been found to be infected with Omicron in the state, taking the tally to 32. pic.twitter.com/zbmMYMcksL
राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज नव्या 4 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी दोन रुग्ण उस्मानाबादेतील, एक रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण बुलढाणा येथील आहे. आतापर्यंत 28 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे.