Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकांची तयारी; शिंदे गट आणि भाजपची आज महत्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:27 IST

राज्यातील महापालिका निवडणुका काही दिवसात जाहीर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, आगामी महापालिका निवडणुकांसाठी आज शिंदे गट आणि भाजपची संध्याकाळी ८ वाजता सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक होणार आहे.

राज्यातील महापालिका निवडणुका काही दिवसात जाहीर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, आगामी महापालिका निवडणुकांसाठी आज शिंदे गट आणि भाजपची संध्याकाळी ८ वाजता सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुढच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. 

राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपची रणनीती काय असेल या संदर्भात ही बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गटातील वरिष्ठ नेते आणि भाजपमधील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. 

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गट आणि भाजप युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुका या एकत्र लढण्याच्या चर्चा सुरु आहेत. यापार्श्वभूमिवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मुंबईतील विविध विकास कामांचे ते उद्धाटन करणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी दुसऱ्यांचा महाराष्ट्रात येत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारी रोजी मुंबईत येत असून, त्या आधी १६ आणि १७ जानेवारी रोजी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीत होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दाओस दौरा अडचणीत आला आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातो.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आता 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी सुनावणी

गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा व सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज मंगळवारी होणार होती. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगातही शिवसेना व निवडणूक चिन्हांच्या दाव्यावर प्रत्यक्ष सुनावणी होणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. १४ फेब्रुवारीपासून घटनापीठासमोर सलग ही सुनावणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. तसेच, व्हॅलेंटाईन डे दिवशी सुनावणी असल्याने सर्वकाही प्रेमाने होईल, असेही ते म्हणाले.  

तारीख पे तारीख... महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आता 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी सुनावणी

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वादानंतरची संत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी थेट व्हॅलेंटाईन डे रोजीच घेण्यात येणार आहे. देशाच्या सरन्यायाधीशांनी ही सुनावणी पुढे ढकलल्याचे सांगितले. त्यावर, दोन्ही गटाच्या वकिलांनी हरकत न घेता, मान्यता दिली आहे.  तसेच, ठाकरे गटाच्या ७ सदस्य खंडपीठाची मागणी अद्याप मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे, पुढील सुनावणी ही ५ न्यायाधीशांच्या खंडपीठात होणार की, ७ न्यायाधीशांच्या खंडपीठात याबाबत निश्चिती नाही. मात्र, सत्ता संघर्षाच्या पुढील सुनावणीसाठी अजून १ महिना वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :भाजपाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस