Join us

Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 15:18 IST

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत.

Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकीचा धडाका काहीच दिवसात सुरू होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते सुरज चव्हान यांनी केला आहे. चव्हाण यांनी ट्विट करुन महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 

१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता

"महाविकास आघाडीत तिकीट वाटपावरून नानाभाऊ पटोले आणि संजय राऊत यांच्यात जोरात खडाजंगी झाली,असा दावा सुरज चव्हाण यांनी  ट्विचमध्ये केला आहे. "महाविकास आघाडीची तिकीट वाटप बैठक म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन" अशी होती.बैठकीच्या दरम्यान महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या नेत्यांनी विसरू नये म्हणजे झालं, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. ८ ऑक्टोबरला हरियाणा, जम्मू काश्मीर निवडणुकीचे निकाल लागणार आहे. १० ऑक्टोबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल. नियमानुसार एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असं बोललं जाते. 

महाराष्ट्रात नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात यायला हवी. तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे गरजेचे आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४५ दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले तर त्यासाठी ऑक्टोबरला १३ ते १६ या तारखांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करावी लागेल. त्यामुळे ४५ दिवसांनी राज्यात नवं सरकार येऊ शकते.

टॅग्स :महाविकास आघाडीअजित पवार