Maharashtra Politics ( Marathi News ) : महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेवरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी आता एक नवीन आरोप केला आहे. 'निवडणूक काळात खोटी बिल वाटण्यात आली, निकालानंतर थकबाकीसह बिलं पाठवण्यात आल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला आहे.
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही; RSS नेत्याचं खळबळजनक विधान
शेतकऱ्यांच्या वीज बिलावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार कैलास पाटील यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला आहे.
आमदार कैलास पाटील म्हणाले, महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवले आहे. सरकारने निवडणूक काळात मतं मिळवण्यासाठी खोटी आश्वासने दिली. खोटी बिलं वाटली, विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांना झिरो बिल दिले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो पाहायला मिळतात, असंही कैलास पाटील म्हणाले. यावेळी कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांची वीज बिलं दाखवली. या शेतकऱ्याला निवडणुकीआधी झिरो वीज बिल होतं, निवडणुकीनंतर १ लाख १२ हजार थकीत वीज बिल आले आहे, असंही पाटील म्हणाले.
"तुम्ही विधानसभेत मोफत वीजची घोषणा केली. एखादा शेतकरी लगेच विश्वास ठेवतो. निवडणुकीपूर्वी घरोघरी जाऊन बिलं वाटली. आता नंतर त्यांना थकबाकीची बिलं येत असतील तर त्यांची भावना काय असेल, असं कैलास पाटील म्हणाले. प्रत्येक शेतकऱ्याला अशीच बिलं येत आहेत. याचं सरकारनं उत्तर द्यावं, अशी मागणी कैलास पाटील यांनी केली.
शेतकऱ्यांना चालू बिल माफ केले आहे. थकबाकीसह माफ केले, याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. मागची थकबाकी जर माफ केली असेल तर ही बिल कशी येत आहेत, असे कैलास पाटील म्हणाले.