Maharashtra Politics : आदित्य ठाकरेंनी सलग तीनवेळा देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:58 IST2025-01-09T13:57:13+5:302025-01-09T13:58:30+5:30

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Maharashtra Politics Aditya Thackeray met Devendra Fadnavis three times in a row; What is the real reason? | Maharashtra Politics : आदित्य ठाकरेंनी सलग तीनवेळा देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; नेमकं कारण काय?

Maharashtra Politics : आदित्य ठाकरेंनी सलग तीनवेळा देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; नेमकं कारण काय?

Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीनवेळा भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरी आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यात होणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली आहे. आज सकाळीच आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. आजची ही भेट तिसरी भेट होती. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घमासान; जयंत पाटील झाले आक्रमक, कारण...

या आधी आदित्य ठाकरे यांनी नागपुरात अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या सलग भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. मागच्यावेळी ठाकरेंनी भेट घेतली त्यावेळी त्यांनी माध्यमांना ही भेट मुंबईतील विविध प्रश्नांसंदर्भात होती अशी प्रतिक्रिया दिली. मुंबईतील विविध प्रश्नांबाबत ते भेट घेणार आहेत, तर दोन दिवसापूर्वी झालेल्या टोरेस घोटाळ्या संदर्भात चर्चा करु शकतात. 

आमदार आदित्य ठाकरेंनी काय सांगितले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ठाकरे म्हणाले, सर्वच पोलिस कॅम्पसमध्ये दंडनीय शुल्क लावला आहे. तो शुल्क स्थगित करण्याची मागणी केली. मागच्या सरकारने यावर स्थगित देणार सांगितले होते पण त्यांनी तसे केले नाही. मुंबई पोलिसांना मुंबईतच घर मिळावेत अशी मागणी केली. तसेच आमच्या सरकारच्या काळात सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती, पण मागच्या सरकारने हे स्थगित केले. ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्याची मागणी केली. याबाबत आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. 

"मुंबईत झालेल्या टोरेस घोटाळा झाला आहे, त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली. पाणी आणि पोलिसांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर पॉझिटिव्ह आहेत. आमच्या होणाऱ्या भेटीगाठी जनहीताच्या कामासाठी आहेत, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामनाच्या अग्रलेखातून कौतुक करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ जानेवारी रोजी गडचिरोलीचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सुरू केलेल्या एसटी बसचे अनावरण केले होते. क्षलवादी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीला पोलाद शहर करण्याचा केलेला निर्धार आणि नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केलेलं आत्मसमर्पण या सगळ्याचे कौतुक सामनातून केले होते. या अग्रलेखातील कौतुकानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. काही महिन्यातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. 

Web Title: Maharashtra Politics Aditya Thackeray met Devendra Fadnavis three times in a row; What is the real reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.