Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र व्यवस्थापनात महाराष्ट्राचीच डरकाळी! राज्याच्यातील वनखात्याची दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 20:08 IST

२०१४ मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० होती.

चंद्रपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतातील वाघांची संख्या आणि व्याघ्रसंवर्धनात झालेले कार्य संपूर्ण देशापुढे मांडले. भविष्यात अधिक उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या या कामगिरीत महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा असून गेल्या नऊ वर्षांमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व्याघ्र व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्रानेच डरकाळी फोडली आहे.

अदानींच्या मुद्द्यावरुन शिंदे-गांधी भिडले, केंद्रीयमंत्र्यांचे राहुल गांधींना ३ प्रश्न

२०१४ मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० होती. त्यावेळी महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी सूत्र हाती घेतली आणि सर्वांत आधी वन्यजीव व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत केले. व्याघ्र संवर्धनातून व्याघ्र व्यवस्थापनाचा मार्ग त्यांनी शोधला आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. वाघांची शिकार रोखून त्यांचे संवर्धन करणे, त्यांच्या सुरक्षेची हमी देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जंगलांमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. केवळ भारतातीलच नव्हे तर देशाबाहेरील पर्यटकांनाही महाराष्ट्रातील जंगलं आकर्षित करतील यासाठी प्रयत्न केले. व्याघ्र संवर्धनाच्या संदर्भात जनजागृतीचे उपक्रम त्यांनी राबविले. आज २०२३ मध्ये महाराष्ट्रातील वाघांची संख्या चारशेच्या आसपास गेली आहे. त्याचे श्रेय महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धन व व्याघ्र व्यवस्थापनाला जाते.

अभिनयातला ‘वाघ’ आला होता धावून

व्याघ्रसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनयातला ‘वाघ’ महानायक अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत होण्याचे आवाहन केले. अमिताभ बच्चन यांनी आनंदाने त्याचा स्वीकार केला. सर्वसामान्यांना व्याघ्रसंवर्धनाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याशिवाय व्याघ्रसंवर्धनासाठी माझ्या आवाजाचा आणि चेहऱ्याचा वापर होत आहे, याचा आनंदही त्यांनी मुनगंटीवार यांच्याकडे व्यक्त केला होता. 

दुपटीने वाढले वाघ

महाराष्ट्रातील वाघांची संख्या २०१४च्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आज ही संख्या चारशेच्या आसपास आहे. त्यातही एकट्या ताडोबा प्रकल्पातच दोनशेहून अधिक वाघ आहेत. उर्वरित वाघ पेंच, बोर, उमेर-कऱ्हांडला, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री क्षेत्र, गडचिरोली या जंगलांमध्ये असल्याची नोंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा विदर्भाच्या दिशेने जास्त आहे. 

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारभाजपानरेंद्र मोदी