Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार; प्रकल्प खर्च १ लाख कोटी, सुधारित आराखडा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 06:40 IST

Shaktipeeth Mahamarg Expansion: सुधारित आराखडा मंजूर करण्यात आला असून आखणीत बदल करण्यात आला आहे

मुंबई: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आखणीत बदल करण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्याचा समावेश केला आहे.

मार्ग बदलामुळे प्रकल्पखर्च १ लाख १ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आधीच्या मंजूर महामार्गाच्या तुलनेत लांबी ५४ किमीने वाढेल.

हे तालुके जोडले : हदगाव, कळमनुरी, वसमत, परभणी, औंढा नागनाथ, बार्शी, माढा, पंढरपूर, माळशिरस, माण, खटाव, कडेगाव, पलूस, इस्लामपूर, करवीर, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड

बदल कशामुळे?

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द केली होती. आता या महामार्गाची सुधारित आणखी तयार केली आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये 

नागपूर ते गोवा हे अंतर १८ तासांवरून ८ तासांवर येणार 

महाराष्ट्रातील १३ जिल्हे, ४० तालुके, ४०० गावे जोडणार 

प्रकल्पात एकूण ६ बोगदे उभारले जाणार 

२१ धार्मिक स्थळांना जोडणार

भूमी अधिग्रहण लवकरच

राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, राज्य सरकारने आराखड्यातील बदलांना मंजूरी दिली आहे. आता अधिग्रहणासाठी नोटिसा जारी करून संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण केला जाईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shaktipeeth Highway to Traverse Satara District; Project Cost Soars

Web Summary : The revised Nagpur-Goa Shaktipeeth Highway will now include Satara district. Route changes, including adding thirteen districts and forty talukas, increased the project cost to ₹1.01 lakh crore. It will connect twenty-one religious sites and reduce travel time to eight hours.
टॅग्स :शक्तिपीठ महामार्गसातारा परिसरकोल्हापूर