Join us  

Maharashtra Government: ''मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 3:33 PM

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केल्यास सहा महिने देखील त्यांचे सरकार टिकणार नाही.

मुंबई: राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापन केल्यास सहा महिने देखील त्यांचे सरकार टिकणार नाही. त्यामुळे पुन्हा भाजपाचेच सरकार येईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

शरद पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात पुन्हा भाजपाचेच सरकार येईल या विधानावर विचारले असता मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं म्हणत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

 सत्तास्थापनेबाबत शरद पवारांनी दिले मोठे संकेत; सरकार बनविण्याची प्रक्रिया सुरु मात्र...

काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष आहेत. सरकार चालवताना या मुद्द्यावर आम्ही कायम राहू. मुस्लिम आरक्षणासंदर्भात कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये चर्चा करू. सरकार केव्हा स्थापन होईल ते सांगू शकत नाही. परंतु मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न असेल. येणारे सरकार तकलादू नसेल. महिला मुख्यमंत्रीसंदर्भात काहीच विचार नाही. शिवसेना, काँग्रेस वगळता इतर कुणाशीही चर्चा करणार सुरु नसल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :शरद पवारदेवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशिवसेनाकाँग्रेस