Maharashtra Government : विद्यार्थ्यांना प्रवास करता यावा यासाठी रेल्वेनं पाठवलेल्या पत्राकडे राज्य सरकारच दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 02:51 PM2021-10-12T14:51:50+5:302021-10-12T14:52:14+5:30

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवासाची परवानगी मिळण्यासाठी रेल्वेने पाठवलं होतं पत्र.

Maharashtra Government ignoring the letter of the railways to provide travel to the school students | Maharashtra Government : विद्यार्थ्यांना प्रवास करता यावा यासाठी रेल्वेनं पाठवलेल्या पत्राकडे राज्य सरकारच दुर्लक्ष

Maharashtra Government : विद्यार्थ्यांना प्रवास करता यावा यासाठी रेल्वेनं पाठवलेल्या पत्राकडे राज्य सरकारच दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देशाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रवास परवानगी मिळवण्यासाठी रेल्वेने पाठवलं होतं पत्र

अल्पेश करकरे
मुंबई : राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, रेल्वेने ४ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला एक पत्र पाठवलं होतं. पण या पत्राला अद्याप कोणतंही उत्तर राज्य शासनाकडून आलेलं नसल्यामुळे येणाऱ्या विद्यार्थ्याना तिकीट खिडकीवरुन विना तिकीट पाठवलं जात आहे.

शाळा-महाविद्यालय शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचऱ्याना परवानगी द्यावी  की देऊ नये या विषयी अद्याप कोणतेही उत्तर आपत्कालीन विभागाकडून रेल्वेच्या पत्राला देण्यात आलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दूरचा प्रवास करायचा कसा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.

४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू
राज्यातील ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांची शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतही विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांचं संमतीपत्रही आनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच शाळांमध्ये उपस्थितीची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना यापुढेही काही दिवस आपले ऑनलाइन शिक्षणच सुरू ठेवायचे आहे, त्यांना त्याप्रमाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करता येणार असल्याचंही यापूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं.

Read in English

Web Title: Maharashtra Government ignoring the letter of the railways to provide travel to the school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.