Maharashtra flag with UPS; More than 80 Marathi faces | जय जय महाराष्ट्र माझा, UPSC परीक्षेत ८० हून अधिक मराठी चेहरे

जय जय महाराष्ट्र माझा, UPSC परीक्षेत ८० हून अधिक मराठी चेहरे

पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. नेहा भोसले हिने देशात १५ वा, बीड येथील मंदार पत्की याने २२ वा, नांदेडच्या योगेश पाटील याने ६३ वा तर सोलापूरमधील राहुल चव्हाण याने १०९ वा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील आठ जणांनी यशाचा झेंडा रोवला आहे तर मराठवाड्यातील १५ जणांनी मोठे यश संपादन केले आहे.

देशात ८२९ उमेदवारांनी यश संपादन केले. प्रदिप सिंह याने देशात प्रथम, जतीन किशोर याने द्वितीय तर प्रतिभा वर्मा हिने तृतीय क्रमांक  पटकवला. खुल्या संवर्गातील ३०४, आर्थिक दुर्बल घटकातील ७८, इतर मागासवर्गीय संवर्गातील २५१, अनुसुचित जाती संवर्गातील १२९, आणि अनुसुचित जमातीसंवर्गातील ६७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून युपीएससी निकालात महाराष्ट्राचा टक्का वाढला असून यंदाही निकालाची परंपरा कायम आहे. मंदार पत्की याने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. पुण्यातील दिव्यांग विद्यार्थी जयंत मंकले यादीत चमकला आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास निश्चितपणे यश मिळू शकते. शेतकरी कुटुंबातील तरूणांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा ध्यास घेतला तरच महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये प्रगती करेल. शेतकऱ्यांचे दु:ख जाणणारी पिढी प्रशासनात असणे गरजेचे आहे.

राज्यातील यशवंत

मंदार पत्की, बीड (२२)
निलेश गायकवाड, लातूर (७५२)
वैभव वाघमारे, बीड (७११)
निखिल दुबे, नागपूर (७३३)
सुमित रामटेके, नागपूर (७४८)
असित कांबळे, उस्मानाबाद (६५१)
गौरी किल्लेदार, कोल्हापूर (२७५)
सुमित महाजन, औरंगाबाद (२१४)
अभिजित सरकाते, जळगाव (७१०)
संग्राम शिंदे, जळगाव (७८५)
श्रीकांत खांडेकर, सोलापूर (२३१)
निमिष पाटील, सांगली (३८९)
अश्विनी वाकडे, सोलापूर (२००)
राहूल चव्हाण, सोलापूर (१०९)
योगेश कापसे, सोलापूर (२४९)
परमानंद दराडे, मुंबई (४३९)
अश्विन घोलपकर, मुंबई (७७३)
आशुतोष कुलकर्णी, पुणे (४४)
जयंत मंकाळे पुणे (१४३)
श्रेणीक लोढा, बीड (२२१)
सत्यजित यादव, सांगली (८०१)
अंकिता वाकेकर, औरंगाबाद (५४७)
प्रणोती संकपाळ, कोल्हापूर (५०१)
अभयसिंग देशमुख, सोलापूर (१५१)
(गुणवत्ता क्रमांक कंसात)


मंदार पत्की (२२)
मी मूळचा बीडचा असलो तरी युपीएससी परीक्षेची तयारी पुण्यात केली. माझे वडील महावितरणमधून सेवानिवृत्त झाले आहेत. प्रशासनात राहून नागरिकांच्या समस्या सोडविता येतात. त्यामुळे मी शासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांसह मार्गदर्शन करण्याऱ्या शिक्षकांमुळे मी हे यश मिळवू शकलो.

योगेश पाटील (६३)
मी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी या गावचा आहे. वडील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. पुण्यात अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर २०१८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात मी युपीएससीमध्ये यश मिळवले. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा २०१९ परीक्षेतही मला यश संपादन करता आले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra flag with UPS; More than 80 Marathi faces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.