Maharashtra Government:शिवसेना आमदार, कार्यकर्ते हिरमुसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 04:13 IST2019-11-24T04:12:57+5:302019-11-24T04:13:15+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार, असा प्रचंड विश्वास असलेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये शनिवारी सकाळच्या घटनाक्रमाने तेवढीच निराशा पसरली. मंत्रिपदाची आस असलेले आमदारही हिरमुसले.

Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena MLA, activist Disappointed | Maharashtra Government:शिवसेना आमदार, कार्यकर्ते हिरमुसले

Maharashtra Government:शिवसेना आमदार, कार्यकर्ते हिरमुसले

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार, असा प्रचंड विश्वास असलेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये शनिवारी सकाळच्या घटनाक्रमाने तेवढीच निराशा पसरली. मंत्रिपदाची आस असलेले आमदारही हिरमुसले.
शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम सध्या विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेल ललितमध्ये आहे. शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी सर्व तयारीनेच या असे निरोप त्यांना देण्यात आले होते. काल दिवसभर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आमदारांच्या बैठकी झाल्या आणि त्या बैठकींच्या शेवटी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील, असे चित्र समोर आले.
शुक्रवारच्या घटनाक्रमाने आमदारांना उभारी दिली. हॉटेल ललितवर पुन्हा एकदा आमदारांमध्ये उत्साह संचारला. शनिवारी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात नव्या सरकारच्या स्थापनेसाठी दावा केला जाईल, अशी आशा घेऊनच आमदार झोपले पण सकाळी त्यांचा हिरमोड झाला.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena MLA, activist Disappointed