Join us  

Maharashtra Election 2019: ...तर काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होईल; संजय निरुपम यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 12:11 PM

'ज्या दिवशी सहनशक्तीचा अंत होईल, तेव्हा पुढचा निर्णय घेईन.'

मुंबईः 'मी माझ्या कार्यकर्त्यासाठी मुंबईतलं फक्त एक तिकीट मागितलं होतं, पण तेही दिलं गेलेलं नाही. त्यामुळे मी काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होणार नाही', असा आक्रमक पवित्रा घेणारे माजी खासदार संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर शरसंधान केलं आहे.

काँग्रेसने पुन्हा नव्या जोमाने झेप घ्यावी, ही माझी भावना आहे आणि त्यासाठी यापुढेही काम करण्याची इच्छा आहे. परंतु, मला ज्या पद्धतीची वागणूक दिली जातेय, ती तशीच मिळत राहिली तर फार काळ थांबणं शक्य नाही, असं निरुपम यांनी  स्पष्ट केलं.   

भाजपाच्या बालेकिल्ल्यातून तिकीट मिळवणारे सुनील राणे आहेत तरी कोण?

तिकीट का कापलं माहीत नाही; पक्षाने कारण सांगितलं नाही; विनोद तावडे संधीच्या प्रतीक्षेत

देशातील, राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. ती पक्षश्रेष्ठींना समजून घ्यावी लागेल. चापलुसी न करणाऱ्या नेत्यांना, बंद खोली राजकारण न करणाऱ्या नेत्यांना संधी द्यावी लागेल, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल. जे सुरू आहे ते अजून तरी सहन करू शकतोय. ज्या दिवशी सहनशक्तीचा अंत होईल, तेव्हा पुढचा निर्णय घेईन, असंही त्यांनी सूचित केलं. 

तीन तिगाडा, काम बिगाडा... एकनाथ खडसेंचा पत्ता कट होण्याची तीन कारणं!

'मातोश्री'च्या अंगणातच बंडखोरी; तृप्ती सावंत अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार

राजकीय महाकुंभात उतरली घराणेशाही

संजय निरुपम यांनी गुरुवारी नाराजीचं ट्विट केले होतं. 'मुंबईतील एका जागेसाठी मी एका नावाची शिफारस केली होती. मात्र, काँग्रेसच्या तीनही याद्यांमध्ये माझ्या शब्दाला मान देण्यात आलेला नाही. मी देलेली नावं नाकारण्यात आली आहेत. त्यामुळे कदाचित काँग्रेस पक्षाला माझं काम, सेवा नको आहे, असंच मला वाटते. त्यामुळे मी पक्षाच्या प्रचारात सहभागी होणार नाही', असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी आज केला आहे आणि पुढचं पाऊल उचलण्याचा इशारा देत पक्षनेतृत्वावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019संजय निरुपमकाँग्रेसबोरिवलीगोरेगाव