Join us  

महाराष्ट्र निवडणूक २०१९: आता कसोटीचा काळ काँग्रेस-राष्ट्रवादीचा; संजय राऊतांनी केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 10:21 AM

राज्याच्या हितासाठी या पक्षांनी एकत्र यायला हवं. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा मुख्यमंत्री होऊ नये आज त्यांचा कसोटीचा काळ आहे.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेसाठी शिवसेनाकाँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळविण्याची कसरत सुरु केली आहे. भाजपाने राज्यात आणि देशात जे काम केलं आहे त्यामुळे भाजपाचे मुख्यमंत्री होऊ नये असं बोलत होते. आज दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी भूमिका स्मरून पुढील निर्णय घ्यावा असं आवाहन शिवसेनेने केलं आहे. त्यामुळे सरकार बनविण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे हे स्पष्ट झालं आहे. 

याबाबत बोलताना संजय राऊतांनी सांगितले की, राज्याच्या हितासाठी या पक्षांनी एकत्र यायला हवं. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा मुख्यमंत्री होऊ नये आज त्यांचा कसोटीचा काळ आहे. जे बोलत होते ते करुन दाखविण्याची वेळ आलेली आहे. आम्ही सगळे एकत्र येत राज्यात स्थिर सरकार देऊ हा विश्वास शिवसेनेला आहे. शेतकरी, महागाई, बेरोजगारी, विकास या किमान समान कार्यक्रम धर्तीवर राज्यात या सरकार बनवू असा विश्वास आहे. राज्यपालांनी जास्त वेळ दिला असता तर बरं झालं असतं असंही संजय राऊतांनी सांगितले आहे. 

तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणे, ५०-५० फॉर्म्युल्यावर ठाम न राहणे मग विरोधी पक्षातदेखील बसू हा जनतेचा अपमान आहे. उद्धव ठाकरेंच्या आदेशाने केंद्रीय मंत्री राजीनामा देत आहे. एका मंत्रिपदासाठी अशा खोट्या वातावरणात का राहावं? महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालं ते दुर्दैवी, यासाठी भाजपाच जबाबदार आहेत. जे ठरलं आहे त्यावरुन बोलण्यास तयार नाही तर कोणतं नातं आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत अरविंद सावंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? असा सवाल त्यांनी केला आहे. 

महत्वाच्या बातम्या

शिवसेनेला सत्तास्थापनेपासून दूर ठेवण्याची 'अशी' रणनीती; भाजपा कोअर कमिटीची पुन्हा बैठक

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत मंत्रिपदाचा राजीनामा देणार; शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता

शिवसेनेविरोधात भाजपाचं षडयंत्र; संजय राऊतांनी केला मोठा खुलासा 

भाजपाच्या अहंकारामुळे राज्यावर ही वेळ ओढवलीय, संजय राऊत यांचे टीकास्र

सत्तास्थापनेसाठी दिल्लीत खलबतं; शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक

 

 

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस