Join us  

Maharashtra Election 2019 : नरेंद्र मोदी उद्यापासून प्रचारात; मुंबईतील सभेने होणार सांगता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 6:08 AM

काँग्रेसचे नेते राहुल गांधीसुद्धा रविवार, १३ आॅक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्रातील प्रचारात उतरणार आहेत. भाजप उमेदवारांसाठी ते चार दिवसात ९ सभा घेतील. जळगावच्या सभेने सभांना सुरुवात होणार असून, १८ तारखेला मुंबईतील सभेने सांगता होईल.पंतप्रधानांच्या १३ आॅक्टोबर रोजी जळगाव व भंडाऱ्यातील साकोली येथे सभा होतील. नंतर १६ आॅक्टोबरला अकोला, पनवेल व परतूर येथे त्यांच्या सभा होतील. १७ आॅक्टोबर रोजी पुणे, सातारा, परळीत तर १८ आॅक्टोबरला मुंबईतही सभा होईल.दौ-याचा कार्यक्रमरविवार, १३ आॅक्टोबर :जळगाव, साकोली (जि. भंडारा)बुधवार, १६ आॅक्टोबर : अकोला , परतूर (जि. जालना), ऐरोली ( जि. ठाणे )गुरुवार , १७ आॅक्टोबर :परळी (जि. बीड), पुणे , साताराशुक्रवार , १८ आॅक्टोबर : मुंबई

राहुल रविवारी राज्यात : काँग्रेसचे नेते राहुल गांधीसुद्धा रविवार, १३ आॅक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. लातूर जिल्ह्यात औसा येथील सभेनंतर सायंकाळी मुंबईतील काँग्रेस उमेदवारांसाठी गांधी दोन सभा घेतील.

टॅग्स :नरेंद्र मोदीभाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019