Maharashtra Election 2019: अपक्षांना रोड रोलर, गॅस सिलिंडर, करवत, जहाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 04:14 IST2019-10-09T04:08:00+5:302019-10-09T04:14:16+5:30
उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात २४४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये अनेक अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

Maharashtra Election 2019: अपक्षांना रोड रोलर, गॅस सिलिंडर, करवत, जहाज
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या उमेदवारांना रोलर, गॅस सिलिंडर, करवत, जहाज, कपाट, शिवण यंत्र, माइक अशी विविध चिन्हे देण्यात आली आहेत.
उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात २४४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये अनेक अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एमआयएम, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष, जनता दल सेक्युलर अशा मान्यताप्राप्त पक्षांचे चिन्ह निश्चित असल्याने त्यांच्या उमेदवारांना पक्षाचे चिन्ह देण्यात आले.
याशिवाय अपक्षांना माइक, ऊस शेतकरी, शिवण यंत्र, ड्रील मशिन, बॅट, खाट, आॅटो रिक्षा, रोड रोलर, गॅस सिलिंडर, शिट्टी, कोट, कप आणि बशी, पेनाची निब सात किरणांसह, कॅरम बोर्ड, चालण्याची काठी, जहाज, चावी, सफरचंद, बॅटरी टॉर्च, दुर्बीण, सीसीटीव्ही कॅमेरा, बिस्कीट, हॅट, बासरी, हेलिकॉप्टर, लिफाफा, सायकल पंप, टॅक्टर चालविणारा शेतकरी, हिरा, काचेचा पेला, पाण्याची टाकी, फळा, रोड रोलर, नारळाची बाग, दूरदर्शन, खटारा, स्टेस्थोस्कोप अशी विविध चिन्हे देण्यात आली आहेत.