महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती राजवटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; शिवसेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 08:03 PM2019-11-12T20:03:43+5:302019-11-12T20:11:14+5:30

राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले आहे.

Maharashtra Election 2019: Devendra Fadnavis indirectly target Shiv Sena over President rule | महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती राजवटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; शिवसेनेवर निशाणा

महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती राजवटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; शिवसेनेवर निशाणा

Next

मुंबई: राज्यातील जनतेने अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असताना सुद्धा महाराष्ट्रात कोणतेही सरकार स्थापन न होणे आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तसेच लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

 आधी आमचं ठरू दे, मग शिवसेनेबाबत विचार करू; अहमद पटेल यांचं सूचक विधान

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अतिशय सुस्पष्ट जनादेश महायुतीला मिळाला होता. तथापि राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे आपल्याला राष्ट्रपती राजवटीला सामोरे जावे लागले आहे. त्याचप्रमाणे आज राज्यापुढे अनेक प्रश्न आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पावसाने आपला बळीराजा संकटात असल्याचे देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; आदेशावर रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणार्‍या गुंतवणुकीवर विपरित परिणाम होईल. सरकारचे दैनंदिन कामकाज प्रभावित होईल आणि त्यातून पर्यायाने जनतेचीच गैरसोय होते. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हटले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Devendra Fadnavis indirectly target Shiv Sena over President rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.