Join us  

Maharashtra Election 2019: महायुती जाहीर! जर बंडखोरी केली असेल तर 2 दिवसांत अर्ज मागे घ्या अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 6:39 PM

लोकसभा निवडणुकीतील विजयात महाराष्ट्राने मोठा वाटा दिला. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता संपली आहे. शिवसेना-भाजपा मित्रपक्ष एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद झाली. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकसभेवेळी आम्ही युती केली होती. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, जागावाटपावरुन तिढा असेल पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एक आहोत. युती होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. मात्र युती होणार यावर आम्ही ठाम होतो. व्यापर वैचारिक भूमिका आम्ही दोन्ही पक्षांनी स्वीकारली. लोकसभेवेळी मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड प्रमाणात यश दिलं. लोकसभा निवडणुकीतील विजयात महाराष्ट्राने मोठा वाटा दिला. लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही आम्हाला भरघोस प्रमाणात विजय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजपर्यंत कोणाला मिळाला नाही एवढा विजय आम्हाला मिळेल ही खात्री आहे असंही ते म्हणाले.

तसेच आदित्य ठाकरे लवकरच आमच्यासोबत काम करतील, मुंबईत सर्वाधिक मतांनी आदित्य ठाकरे निवडून येतील, एकीकडे तरुण, युवा नेतृत्व महाराष्ट्रात फिरतंय ते विधानसभेत आमच्यासोबत काम करतील हा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. 

दरम्यान, काही जणांनी बंडखोरी केली पुढच्या दोन दिवसांत जेवढे बंडखोर आहे त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्यात कुठेही बंडखोरी राहणार नाही असा विश्वास आहे. जर कोणी बंडखोरी केली तर यापुढे त्याला युतीच्या कोणत्याच पक्षात जागा राहणार नाही, महायुतीच्या माध्यमातून त्याला त्यांची जागा दाखविण्यासाठी ताकद पणाला लावू असा इशारा मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना दिला. तसेच बरेच दिवस आमच्यामुळे तुम्हाला बातम्या मिळाल्या, पुढेही मिळतील, शिवसेना 124 जागा लढवित आहे, बाकी आम्ही अन् मित्रपक्ष जागा लढवतोय, त्यामुळे महाराष्ट्राच्या मनातील महायुती प्रत्यक्षात उतरली आहे असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. 

महत्वाच्या बातम्या 

...तर मी शिवसेनेचा प्रचारही करायला तयार- नारायण राणे

अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार

अजित 'दादां'ची सोलापुरात वेगळीच खेळी, प्रणिती शिंदेंविरुद्ध राष्ट्रवादीची बंडखोरी!

कोहिनूर 'नांद'ला नाही; रम्याचा राज ठाकरेंना टोला

कणकवलीत अटीतटीची लढत! नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात ब्राह्मण महासंघही मैदानात

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात उरली आहे का?; विद्यमान आमदाराची उद्धव ठाकरेंवर नाराजी

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा