Join us  

Maharashtra Election 2019 : भाजपाच्या बालेकिल्ल्यातून तिकीट मिळवणारे सुनील राणे आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 10:49 AM

सुनील राणे यांच्या उमेदवारीमुळे बोरिवलीकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देसुनील राणे यांच्या उमेदवारीमुळे बोरिवलीकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बोरिवली विधानसभा मतदार संघातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता अखेर कट झाला.भाजपाने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत अचानक सुनील राणे यांचे नाव आल्याने भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मनोहर कुंभेजकर

मुंबई - बोरिवली विधानसभा मतदार संघातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता अखेर कट झाला आहे. त्यांच्या जागी भाजपा नेते सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुनील राणे यांच्या उमेदवारीमुळे बोरिवलीकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. लोकमतने सुरुवातीपासून तावडे यांचे तिकीट कापणार असे वृत्त दिले होते.

बोरिवली मतदार संघातून विधानपरिषद आमदार व मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती प्रवीण दरेकर, माजी आमदार हेमेंद्र मेहता, पालिकेचे नगरसेवक प्रवीण शाह यांची नावे चर्चेत होती. तर दरेकर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र शुक्रवारी (4 ऑक्टोबर) सकाळी भाजपाने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत अचानक सुनील राणे यांचे नाव आल्याने भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोण हे सुनील राणे असा सवाल शिवसेनेच्या एका जेष्ठ नगरसेविकेने लोकमतशी बोलताना केला आहे.

सुनील राणे हे 1995 ते 1999 या काळात युती सरकार मधील दिवंगत शिक्षण मंत्री दत्ता राणे यांचे सुपुत्र आहे. 1995 च्या विधानसभा मतदार संघात दत्ता राणे यांनी झुंजार कामगार नेते दिवंगत दत्ता सामंत यांचा पराभव केला होता. सुनील राणे हे मुंबई भाजपाचे सरचिटणीस आहेत. 2014 साली अखेरच्या क्षणी युती तुटल्यावर सुनील राणे यांना भाजपाने वरळी विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले. मात्र आमदार सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला होता. सुनील राणे हे कांदिवली पश्चिम चारकोप येथील अर्थर्व इंजिनियरिंग महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आहेत. 

भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केलेली आहे. या यादीत मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या ऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिला उमेदवारी देण्यात आली आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्या जागी भाजपा नेते सुनील राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपानं चौथ्या यादीत सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर दुसरीकडे राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना कुलाब्यातून तिकीट देण्यात आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी इथूनच उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची चर्चा आहे. काटोलमधून चरण सिंग ठाकूर, तुमसर- प्रदीप पडोले, नाशिक पूर्व- राहुल धिकले, बोरिवली- सुनील राणे, घाटकोपर पूर्व- पराग शाह, कुलाबा- राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.   

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019विधानसभा निवडणूक 2019बोरिवलीशिवसेनाभाजपाविनोद तावडे