Maharashtra Election 2019 : आठ ठिकाणी युतीतील बंड कायम; रायगडमध्ये आघाडी आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 06:05 AM2019-10-08T06:05:58+5:302019-10-08T06:10:02+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी मुंबईतून तब्बल ३७ उमेदवारांनी माघार घेतली.

Maharashtra Election 2019: Alliance revolts in eight places; In Raigad, face to face | Maharashtra Election 2019 : आठ ठिकाणी युतीतील बंड कायम; रायगडमध्ये आघाडी आमनेसामने

Maharashtra Election 2019 : आठ ठिकाणी युतीतील बंड कायम; रायगडमध्ये आघाडी आमनेसामने

Next

मुंबई /ठाणे /पालघर/अलिबाग : मुंबईत मातोश्रीच्या अंगणात म्हणजे वांद्रे पूर्व मतदारसंघात तृप्ती सावंत, वर्सोव्यातून शिवसेनेच्या राजुल पटेल, अंधेरी पूर्वेत भाजपच्या मुरजी पटेल यांनी केलेली बंडखोरी अर्ज माघारीनंतरही कायम राहिली आहे.
कल्याण पूर्वमध्ये शिवसेनेचे धनंजय बोडारे, कल्याण पश्चिमेत भाजपचे नरेंद्र पवार, मीरा- भार्इंदरमध्ये भाजपच्या गीता जैन यांचे बंड कायम आहे. बेलापूरमध्ये शिवसेनेचे विजय माने हे रिंगणात राहिल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. उरणमध्ये भाजपचे बंडखोर महेश बालदी यांनी माघार घेतलेली नाही. अलिबागमध्ये काँग्रेसमधून बंडखोरी केलेले राजेंद्र ठाकूर यांच्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी मुंबईतून तब्बल ३७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे मुंबईतील ३६ मतदारसंघात एकूण ३३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या तिघा असंतुष्टांनी माघार घेण्यास साफ नकार देत बंडाचे निशाण कायम ठेवले आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उमेदवारी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता या दिग्गजांसह राज पुरोहित आणि सरदार तारासिंग या विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे या चारही नेत्यांच्या मतदारसंघातून बंडखोरी झालेली नाही. तिकीट कापलेल्या नेत्यांच्या समर्थकांकडून असहकार पुकारण्याची शक्यता गृहीत धरून भाजपने रणनीती आखण्यास सुरू केली आहे. आदित्य ठाकरेंमुळे वरळीतील लढत लक्षवेधी बनली आहे.

चांदिवलीत सर्वाधिक १५ मतदार
मुंबईतील चांदिवली मतदारसंघात सर्वाधिक १५ उमेदवार आहेत. तर,
वांद्रे पश्चिम, बोरीवली, शिवडी आणि माहिम या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात कमी चार उमेदवार आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019: Alliance revolts in eight places; In Raigad, face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.