मुंबई शहरातील निवडणुकीसाठी २१ हजार कर्मचारी तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:35 AM2019-10-05T03:35:53+5:302019-10-05T03:36:40+5:30

मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या दहा विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, तब्बल २१ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

Maharashtra Election 2019 : 21 Thousands of staff deployed for elections In Mumbai city | मुंबई शहरातील निवडणुकीसाठी २१ हजार कर्मचारी तैनात

मुंबई शहरातील निवडणुकीसाठी २१ हजार कर्मचारी तैनात

Next

मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या दहा विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, तब्बल २१ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा कर्मचारी नियुक्ती विभागाचे समन्वयक संपत डावखर यांनी दिली.

मुंबई शहरांतर्गत धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकारी ते निवडणूकविषयक यंत्रणा हाताळणाºया सर्व विभागांतील मनुष्यबळ हे २१ हजार इतके आहे. यात प्रामुख्याने मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, शिपाई, तसेच या सर्वांना सहकार्य करण्यासाठी १,२०० कार्यालयीन कर्मचाºयांची विधानसभा मतदारसंघनिहाय नेमणूक करण्यात आल्याचे डावखर यांनी सांगितले.

गैरहजर कर्मचा-यांवर कार्यवाही
निवडणुकीचे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या कामात गैरहजर राहणाºया अधिकारी, कर्मचाºयांविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. प्रथम प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या जवळपास २,३५० अधिकारी व कर्मचाºयांविरुद्ध कार्यवाही करण्यात आल्याचे डावखर यांनी सांगितले. मात्र, जे कर्मचारी अधिकारी आजारी आहेत व त्यांनी तसे प्रमाणपत्र सादर केले आहे, अशा सर्व आजारी कर्मचाºयांना निवडणूक कामातून वगळण्यात आले आहे.

याशिवाय ज्या कर्मचाºयांची वास्तववादी कारणे आहेत किंवा निकड आहे, त्यांची गरज लक्षात घेत काही अधिकारी व कर्मचाºयांना निवडणुकीच्या कामातून सूट देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2019 : 21 Thousands of staff deployed for elections In Mumbai city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.