Join us

महाराष्ट्र बंद: जाणून घ्या मुंबईत कुठे काय सुरु आहे, रेल्वे, शाळा, बस सेवेची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 13:37 IST

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ आज प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंद पुकारला आहे.

ठळक मुद्देमुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकलसेवा सुरळीत सुरु आहे. मुलुंड चेकनाका परिसरात बसेसच्या चाकांमधील हवा काढण्यात आली.

मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ आज प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. काही तुरळक अपवाद वगळता मुंबईत जनजीवन सुरळीत सुरु आहे. चेंबूर, गोवंडी, घाटकोपर,दादर या भागात बंदचा प्रभाव दिसत आहे. पण अन्यत्र या बंदचा फारसा परिणाम दिसलेला नाही. 

रेल्वे सेवा - मुंबईची लाईफलाईन म्हटली जाणारी लोकलसेवा सुरळीत सुरु आहे. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल वाहतूक सुरळीत सुरु आहे. ठाणे स्थानकात रेल रोकोचा प्रयत्न झाला पण रेल्वे पोलिसांनी लगेचच आंदोलकांना हटवून लोकल वाहतूक सुरळीत केली.  

बससेवा - 2964 बसेसपैकी 2645 मार्गांवर बससेवा सुरु आहे. मुलुंड चेकनाका परिसरात बसेसच्या चाकांमधील हवा काढण्यात आली. नागरिकांना खाली उतरवण्यात आले. त्यामुळे कामाला निघालेले कर्मचारी पुन्हा घराकडे परतले. 

या मार्गावर बेस्ट बसेस चालवण्यास समस्या 

दिंडोशी डेपो, पीएल लोखंडे मार्ग, वरळी जिजामाता नगर, बांद्रा कॉलनी, चांदीवली संघर्ष नगर, साकीनाका खैरानी रोड, कांदिवली आकुर्डी रोड या मार्गावर बस चालवण्यास अडथळा येऊ शकतो. 

टॅक्सी, रिक्षा - तणावाची परिस्थिती आणि हिंसाचाराची भिती असल्याने मुंबईच्या बहुतांश भागातटॅक्सी आणि रिक्षा धावताना दिसत नाहीयत.         

शाळा-महाविद्यालये  चेंबूर, कुर्ला, टिळक नगर भागतील काही शाळांना सुट्टी, पण गिरगाव, ग्रॅण्टरोड, चर्चगेट भागातील काही शाळा सुरु.

मुंबईतील बहुतांश महाविद्यालये सुरू आहेत, मात्र बऱ्याच महाविद्यातयातील बारावी पूर्व परीक्षा होत्या त्या मात्र पुढे ढकलण्यात आल्या आहेत, आज महाविद्यालये  नियमित सुरू असल्याची प्राचार्यांची माहिती

गोंवडी, मानखुर्द, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदीवली पूर्व, मालाड पूर्व, दहिसर पूर्वच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

शाळांमध्ये ३० ते ४०% विद्यार्थ्यांची हजेरी आहे, मुंबई मुख्याध्यापक संघटनेची माहिती.

रास्ता रोको - वाकोल पाईप लाईन, कला नगर बांद्रा, वरळी नाका, बर्वे नगर घाटकोपर येथे रास्ता रोकोचा प्रयत्न झाला. नायगाव दादरमध्ये बीडीडी  चाळीतील रहिवीशांनी परिसरात मोठा मोर्चा काढला आहे.

टॅग्स :भीमा-कोरेगावमहाराष्ट्र बंद