महाराष्ट्र चेंबरची उत्तर महाराष्ट्राची निवडणूक बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 04:27 PM2021-11-23T16:27:05+5:302021-11-23T16:27:16+5:30

Election News: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अग्नरिकल्चरच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात इतर विभागात निवडणूक बिनविरोध होऊन उत्तर महाराष्ट्र विभाग व नाशिकमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होती.

Maharashtra Chamber's election for North Maharashtra unopposed | महाराष्ट्र चेंबरची उत्तर महाराष्ट्राची निवडणूक बिनविरोध

महाराष्ट्र चेंबरची उत्तर महाराष्ट्राची निवडणूक बिनविरोध

Next

मुंबई - महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अग्नरिकल्चरच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात इतर विभागात निवडणूक बिनविरोध होऊन उत्तर महाराष्ट्र विभाग व नाशिकमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु होती. विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी एकत्र बसून सामंजस्याने उत्तर महाराष्ट्राची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. नाशिकच्या कार्यकारिणी पदाच्या २१ जागांसाठी आजपर्यंत निवडणूक झाली नव्हती याचा विचार करून कार्यकारिणी पदांची बिनविरोध
निवड करण्यात आली.

यामध्ये  सुधाकर देशमुख यांना उपाध्यक्षपदाची संधी देण्याचा व सुनिता फाल्गुने यांना नाशिक शाखा चेअरमन पदी व  संजय सोनवणे यांना को-चेअरमन पदी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी  हेमंत गायकवाड, शसंदिप भंडारी यांनी महत्वाची भूमिका बजावली.
कार्यकारीणी सदस्यपदी  हेमंत गायकवाड, कैलास आहेर, श्री. व्हिनस वाणी,  संजय राठी,  रवी जैन, रविंद्र झोपे, हेमंत कांकरिया,  नेमिचंद कोचर,
मनिष रावल, संजय महाजन, सचिन शहा, अंज् सिंघल,  भावेश मानेक, राजेश मालपुरे, डॉ. मिथिला कापडणीस . स्वप्निल जैन, दत्ता भालेराव, 
राजाराम सांगळे, सचिन जाधव कार्यकारिणी समितीवर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष विक्रम सारडा, माजी अध्यक्ष श हेमंत राठी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन श्री.आशिष पेडणेकर, नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश मिलिंद राजपूत,  प्रशांत जोशी
दाशरथी, अध्यक्ष  संतोष मंडलेचा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Maharashtra Chamber's election for North Maharashtra unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.