Maharashtra Budget 2025 : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प; अजित पवारांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:44 IST2025-03-10T14:43:42+5:302025-03-10T14:44:08+5:30
Ajit Pawar on Mumbai Traffic: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra Budget 2025 : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प; अजित पवारांची मोठी घोषणा
Maharashtra Budget 2025 ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात २०२५-२६ या वर्षासाठी अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी सुरुवातीलाच मुंबईतीलवाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबईतीलवाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात दिली.
सध्या मुंबईतील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तासन तास वाहन रस्त्यावरतीच असतात. अनेकांना मिनिटांचा प्रवास काही तासांवर जातो. दरम्यान, आता मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटींचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. ययाशिवाय पुणे शिरूर उन्नत मार्गाचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तर तळेगाव ते चाकण उन्नत मार्गाचं काम प्रस्तावित असल्याचं त्यांनी सांगितलं.
६४ हजार ७८३ कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प
मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
खोपोली ते खंडाळा घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण करणार
यावेळी अजित पवार यांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम २०२५ च्या ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा केली. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल, असंही अजित पवार म्हणाले.