Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय झाला आहे. राज्यात लाडक्या बहिणीची नारीशक्ती; सर्व समाज घटकांचा कौल महायुतीला मिळाला त्यासोबत दलित, बौद्ध आंबेडकरी जनतेने महायुतीला भरघोस मतदान केल्यामुळे महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे देशाचा विकास; त्यामुळे दिसत आहे महायुतीच्या विजयाचा विकास; आम्हाला दिसत आहे निळे निळे आकाश ; महाविकास आघाडी झाली आहे भकास अशी चारोळी सादर करीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या ऐतिहासिक विजयाचे स्वागत केले आहे.
महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश आल्यानेच महायुतीला अभूतपूर्व यश लाभल्याबद्दल रामदास आठवले यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि राज्यभरातील जनतेचे आभार मानले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला. त्यामूळे जनतेच्या डोळ्यात खोट्या प्रचाराची धूळफेक करणाऱ्या महाविकास आघाडीला जनतेने पराभवाची धूळ चारली आहे. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीला महिलांनी चांगलाच धडा शिकवून महायुतीला ऐतिहासिक विजयाची भाऊबीज भेट दिली आहे असे सांगत रामदास आठवले यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. बांद्रा येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर रिपब्लिकन पक्षाक्यावतीने महायुतीचा महविजय ढोल वाजवून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी रामदास आठवले यांनीही ढोल वाजवून महायुतीचा विजय साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन रामदास आठवले यांनी महायुती च्या तिन्ही नेत्यांचे अभिनंदन केले.
१० वर्षांमध्ये १० लाख कोटी पेक्षा जास्त पैसे महाराष्ट्राच्या विकासासाठि केंद्राकडून मिळाले आहेत. नरेंद्र मोदी यांनी गरीब, युवा, महिला, दलित, आदिवासी आणि ओबीसी या सर्वांसाठी काम केलेले आहे. या महाराष्ट्रातील जनतेले भरभरुन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. एकतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने नरेंद्र मोदीजी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून टोमणे मारण्यात आले होते. संजय राऊतसारखे जे नेते होते त्यांनी सातत्याने चुकीच्या पध्दतीने बोलत होते. त्यामुळे लोकांनी ठरविले की, महाविकास आघाडीला धडा शिकवण अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला एक मोठा धडा शिकवण्यात आला आहे. महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केलेल आहे. आम्हाला अपेक्षा होती १७० जांगा मिळतील पण त्यापेक्षा जास्त ६० जागा जास्त मिळाल्या आहेत. महायुतीचे सरकार एक-दोन दिवसांमध्ये स्थापन होईल. संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना दुसरा काही धंदा नाही. त्यामुळे त्यांना फक्त आरोप करण्याचाचा धंदा आहे .
इथला मतदार राहिला नाही अंधा आणि महाविकास आघाडीचा हाच आहे धंदा, राजकारणामध्ये कसे बोलले पाहिजे. अशा पद्धतीचे उलट-सुलट बोलून तुम्हाला मत पडणार नाही, हे लोकांनी त्यांना दाखवून दिले. संजय राऊत म्हणतात त्यांना हा निर्णय मान्य नाही. तुमच्या एवढ्या जागा निवडून आल्या लोकसभेमध्ये तुमच्या जागा निवडून आल्या. लोकशाहीमध्ये पराभव स्वीकारणे हीच खरी लोकशाही आहे. संजय राऊत यांना लोकशाही मान्य नसेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मान्य नसेल, तर संजय राऊत यांना या देशात राहण्याचा अधिकारच नाही. संजय राऊत चांगले माझे मित्र आहेत, अत्यंत चांगले लेखक आहेत.अशा माणसाने आता निकाल आल्यानंतरही त्यांना ते मान्य नाही म्हटल्यावर ते अयोग्य आहे. अशा पद्धतीच्या त्यांचा व्यक्तव्यामुळेच त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे रामदास आठवले म्हणाले.