Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 11:51 IST2024-11-23T11:44:48+5:302024-11-23T11:51:37+5:30
Worli Assembly Election 2024 Result Live Updates: वरळी मतदारसंघात ठाकरेंना मोठा धक्का बसताना दिसत आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
मुंबई
Worli Assembly-Vidhan Sabha Election 2024 Result Live : वरळी मतदारसंघात ठाकरेंना मोठा धक्का बसताना दिसत आहे. मतमोजणीच्या पाच फेऱ्या संपल्या असून आदित्य ठाकरे ५९७ मतांनी पिछाडीवर आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा आघाडीवर आहेत. मनसेचे संदीप देशपांडे ८ हजार मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
पहिल्या पाच फेरींच्या अंती मिलिंद देवरा यांना एकूण १८ हजार २०४ मतं मिळाली आहेत. तर आदित्य ठाकरे यांना १७ हजार ६०७ मतं आहेत. मनसेच्या संदीप देशपांडे यांना ८२८२ मतं मिळाली आहेत. मिलिंद देवरा यांच्याकडे सध्या ५९७ मतांची आघाडी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे याच मतदारसंघातून एकहाती विजय प्राप्त केला होता. पण यावेळी मिलिंद देवरा यांच्या उमेदवारीमुळे अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
दरम्यान, एकंदर राज्यभरात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीनं तब्बल २१८ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर महाविकास आघाडीला फक्त ५८ जागांवर आघाडी आहे. महायुतीमध्ये एकटी भाजपा तब्बल १३० जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदेंची सेना ५४ जागांवर आघाडीवर आहे. अजित पवार गटानंही जोरदार मुसंडी मारली असून ३४ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. मविआमध्ये काँग्रेस २१, ठाकरेंची शिवसेना १९ आणि शरद पवार गट १८ जागांवर आघाडीवर आहेत.