महापरिनिर्वाण दिन LIVE : महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 12:31 IST2018-12-06T08:28:01+5:302018-12-06T12:31:48+5:30
महापरिनिर्वाणदिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे आले आहेत.

महापरिनिर्वाण दिन LIVE : महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला जनसागर
मुंबई : महापरिनिर्वाणदिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे आले आहेत. दादर येथील चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करता यावे, म्हणून राज्यासह देशभरातून अनुयायींनी बुधवारपासूनच रीघ लावली आहे.
चैत्यभुमीवर जाना-या भीम अनुयायांना कामोठे येथे सेनेच्या वतीने अल्पोपहार वाटप
पनवेल: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायन पनवेल महामार्गावर अल्पोपहार वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दादर चैत्यभूमी येथे सायन पनवेल महामार्गावरून जाणार्या आंबेडकरी अनुयायांना अल्पोपहार वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना सल्लागार बबन पाटील, ज़िल्हा प्रमुख शिरीष घरत ,तालुका संघटक दिपक निकम म, शहरउपसंघटक अॅड. श्रीनिवास क्षीरसागर, कळंबोली महिला शहर संघटक ज्योत्ना गडहिरे, शहरप्रमुख अविनाश कोंडिलकर आदी उपस्थित होते.
- दादर रेल्वे स्टेशनचे नामांतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्यासाठी दादर येथे आंबेडकरी अनुयायांनी लावले स्टिकर्स
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदरांजली
- चैत्यभूमी येेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लाखो अनुयायांनी केले अभिवादन