महापारेषणची आता होणार शेअर बाजारात नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:27 IST2025-06-11T09:24:51+5:302025-06-11T09:27:44+5:30

Mahapareshan: महापारेषण कंपनीची मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये लवकरच नोंदणी होणार आहे, असे सांगत महापारेषणचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय आणि सहभागातून महाराष्ट्राला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा दिला पाहिजे, असे प्रतिपादन केले.

Mahapareshan will now be listed on the stock market. | महापारेषणची आता होणार शेअर बाजारात नोंदणी

महापारेषणची आता होणार शेअर बाजारात नोंदणी

मुंबई - महापारेषण कंपनीची मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये लवकरच नोंदणी होणार आहे, असे सांगत महापारेषणचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय आणि सहभागातून महाराष्ट्राला अखंडित व सुरळीत वीजपुरवठा दिला पाहिजे, असे प्रतिपादन केले. महापारेषणमध्ये लवकरच मोठी नोकरभरती होणार असल्याचेही ते म्हणाले. वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात महापारेषणचा २० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात डॉ. संजीव कुमार बोलत होते.

सेफ्टी मॅन्युअलचे प्रकाशन
राज्य वीज मंडळाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, संचलन संचालक सतीश चव्हाण, प्रकल्प संचालक अविनाश निंबाळकर, वित्त संचालक तृप्ती मुधोळकर, अपर जिल्हाधिकारी सुचिता भिकाने, कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर आदी यावेळी उपस्थित होते.  
यावेळी सेफ्टी मॅन्युअल व डिझास्टर मॅन्युअलचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Web Title: Mahapareshan will now be listed on the stock market.