महानिर्मितीचे १००३४ मेगावॅट रेकॉर्ड वीज उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:34 IST2019-05-20T16:34:42+5:302019-05-20T16:34:49+5:30
आज २० मे २०१९ रोजी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्रांमधून रेकोर्ड १००३४ मेगावॅट इतके वीज उत्पादन घेण्यात आले.

महानिर्मितीचे १००३४ मेगावॅट रेकॉर्ड वीज उत्पादन
मुंबई - आज २० मे २०१९ रोजी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्रांमधून रेकोर्ड १००३४ मेगावॅट इतके वीज उत्पादन घेण्यात आले. महानिर्मितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
यामध्ये औष्णिक विद्युत केंद्राचे वीज उत्पादन ७५७७ मेगावॅट, ज्यात नाशिक ५६१ मेगावॅट, कोराडी १५०० मेगावॅट, खापरखेडा ९५१ मेगावॅट, पारस ४५० मेगावॅट, चंद्रपूर २५५० मेगावॅट, भुसावळ ९६७ मेगावॅट तर उरण वायू विद्युत केंद्र २७० मेगावॅट, सौर ऊर्जा ११९ मेगावॅट व जल विद्युत केंद्रांपासून २१०० मेगावॅट वीज उत्पादन घेण्यात आले. राज्यात सर्वदूर कडक उन्हाळा असून विजेची एकूण मागणी २२३०० मेगावॅट पोहोचली असून राज्याचे वीज उत्पादन १७३३७ मेगावॅट (खाजगी वीज उत्पादनासह) इतके आहे. सुमारे ५३५७ मेगावॅट वीज केंद्राच्या वाट्यातून घेण्यात येत आहे.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे यांचे कुशल नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी संचालक व महानिर्मितीच्या औष्णिक, वायू, सौर व जल विद्युत केंद्रातील सर्व संबंधित मुख्य अभियंते व त्या अंतर्गत कार्यरत अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांची हि फलश्रुती असल्याचे संचालक(संचालन) चंद्रकांत थोटवे यांनी सांगितले. १००३४ मेगावॅट ऐतिहासिक रेकोर्ड वीज उत्पादनाबद्दल सर्व संबंधित कुशल मनुष्यबळाचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांनी अभिनंदन केले आहे.