महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाला एप्रिलचा मुहूर्त, प्रकल्प लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 10:22 AM2024-02-17T10:22:36+5:302024-02-17T10:23:53+5:30

बांधकामाचे ९० टक्के काम पूर्ण.

mahalakshmi animal hospital april inaguration project postponed | महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाला एप्रिलचा मुहूर्त, प्रकल्प लांबणीवर

महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाला एप्रिलचा मुहूर्त, प्रकल्प लांबणीवर

मुंबई : परळमधील बैलघोडानंतर मुंबईत आणखी एक पशुवैद्यकीय रुग्णालय महालक्ष्मी येथील महापालिकेच्या भूखंडावर जात असून, या रुग्णालयाचे आता ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्यात हे बांधकाम पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण केले जाणार आहे. पशु वैद्यकीय रुग्णालयासोबतच या ठिकाणी जनावरांच्या शवदाहिनीचीही व्यवस्था आहे. या पशु वैद्यकीय रुग्णालय  व शवदाहिनीचे काम पूर्ण होऊन जानेवारी २०२३ मध्ये लोकार्पण होणे अपेक्षित होते, पुढे डिसेंबर २०२३ची डेडलाइनही पार झाल्याने आता एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होत असल्याने हा प्रकल्प लांबणीवर पडत असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेच्या महालक्ष्मी येथील आर्थररोड कारागृहाच्या मागील बाजूस ३०४५चौ मीटरचा भूखंड आहे. या भूखंडावर दोराबजी टाटा ट्रस्ट या संस्थेच्यावतीने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर या रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे. 

या संस्थेला ३० वर्षा कालावधीकरिता हे रुग्ण चालविण्यास दिले जाणार आर. याबाबतच्या करार पत्रावर स्वाक्षरी झाल्यानंतर या जागेवर रुग्ण आणि प्राण्याच्या शवदाहिनीच्या कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे या रुग्णालयाचे बांधकाम हे जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण ह अपेक्षित होते, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तसा विश्वासही व्यक्त केला होता. 

पुढे हे बांधकाम पूर्ण होण्याची डेडलाइन डिसेंबर २०२३ पर्यंत नेण्यात आली आणि आता हे बांधकाम २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

बांधा आणि वापरा तत्त्वावर उभारणी :

 या रुग्णालयात एकाच वेळी ३०० छोट्या प्राण्यांना अर्थात कुत्रे, मांजर इत्यादींना दाखल करण्याची सुविधा असणार आहे. 

 महालक्ष्मी धोबी घाट येथील महापालिकेच्या एक एकर जागेत पाळीव प्राण्यांचे आणि भटक्या प्राण्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पशुवैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज चार मजली रुग्णालय हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट व मुंबई महानगरपालिकेच्या 
संयुक्त विद्यमाने ‘बांधा, वापरा’ या धर्तीवर बांधण्यात येत आहे. 

 प्राणी दहनभट्टीची सुविधा ही लहान प्राणी जसे पाळीव श्वान, भटके मृत श्वान, मांजरी, पक्षी यांच्याकरिता मोफत उपलब्ध असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काय असणार रुग्णालयामध्ये ?

 ३०० लहान जनावरांसाठी ओपीडी

 शल्य चिकित्सा कक्ष अर्थात सर्जिकल वॉर्ड 

 अपघात आणि आपत्कालीन कक्ष 

 आयसीयु आणि आयसीयू सुविधा

 त्वचा आजार कक्ष  

 ओपीडी मेडिसिन
  
 एम आर आय  

 डायलिसिस सेंटर 

 सोनोग्राफी 

 रक्तपेढी

Web Title: mahalakshmi animal hospital april inaguration project postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.