महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 02:57 AM2020-02-26T02:57:04+5:302020-02-26T02:58:07+5:30

भाजपचे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन

maha vikas aghadi Betrayed farmers says former cm devendra fadnavis kkg | महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला- देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला- देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार तडजोड करून आलेले सरकार आहे. आम्हाला विश्वासघाताची चिंता नाही. परंतु या सरकारने शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.

शेतकºयांच्या प्रश्नांसाठी आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी मंगळवारी भाजपने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले; त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार,आशिष शेलार आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकºयांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही. अवकाळीग्रस्त शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये मदतही दिली नाही; आणि फसवी कर्जमाफी जाहीर करून दिशाभूल करीत आहे. या सरकारने शेतकºयांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विहिरीत पाणी आले. याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होऊ लागला. परंतु महाआघाडी सरकारने ही योजनाही बंद केली. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करावी, यासाठी जिल्हा कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आल्याचे भाजप नेते हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संपूर्ण कर्जमाफीची फसवी घोषणा महाआघाडी सरकारने केली असून शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ३२ लाख शेतकºयांची नोंद झाली असताना फक्त १५ हजार शेतकºयांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सरकारने शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आताचे सरकार हे गजनी सरकार आहे. जे बोलते ते करीत नाही. हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेते, पण महाआघाडीच्या काळात महिलांवरील अत्याचारांत वाढ, महिलांना जिवंत जाळले जाते, या महाआघाडी सरकारचा जेवढा निषेध करू तेवढा कमीच आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: maha vikas aghadi Betrayed farmers says former cm devendra fadnavis kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.